सोयाबीन राईस

by Vaishali Chaudhari

सोयाबीन राईस


प्रस्तावना:: सोयाबीन राईस हा झटपट तयार होणारा आणि लहान मुलांच्या डब्यासाठी दिला जाणारा पदार्थ आहे. सर्व लहान मुलांना अत्यंत आवडतीचा पदार्थ आहे


साहित्य::

  • एक वाटी छोटे सोयाबीन
  • एक वाटी बासमती तांदूळ
  • एक टोमॅटो
  • एक कांदा
  • एक सिमला मिरची
  • 100 ग्रॅम पत्ता कोबी \
  • मॅगी मसाला पॅकेट
  • ओरिगानो पॅकेट
  • तेल
  • जिरे
  • एक चमचा तिखट
  • मीठ
  • कोथिंबीर
  • पाणी


कृती::

एक वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन त्याला शिजवून घ्या. भात असा शिजला पाहिजे की तो मोकळा मोकळा झाला पाहिजे त्याचा गचका होऊ देऊ नये.

दाणा भात शिजला पाहिजे. पातेल्यात सोयाबीन धुऊन घ्या आणि त्यामध्ये पाणी घालून थोडे मीठ घालून सोयाबीन उकडून घ्या.

सोयाबीन उकडणे साधारण पाच मिनिटे लागतात. उकडलेल्या सोयाबीन मधून पाणी वेगळे करून घ्या.एक कांदा लांबा चिरून घ्या.

टोमॅटोही त्याप्रमाणे लांब चिरून घ्या पत्ताकोबी ही बारीक लांब चिरून घ्या. मिरच्याही लांब अशा कापून घ्या.

आपला भात शिजला की एका ताटामध्ये तो मोकळा करून घ्या. कढई मध्ये कडकडीत तेल गरम करा. कडकडीत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे घाला.

आणि त्यामध्ये शिजवलेले सोयाबीन घाला शिजवलेल्या सोयाबीनमध्ये अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा मॅगी मसाला आणि मीठ घालून चांगले खरपूस असे खमंग होतील याप्रमाणे परतवून घ्या.

एकाकडे कढईमध्ये तेल गरम करा. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये लांब कापलेल्या मिरच्या कांदा टोमॅटो पत्ताकोबी घालून मिश्रण चांगले परतवून घ्या.

या परतलेल्या मिश्रणामध्ये अर्धा चमचा तिखट चवीप्रमाणे मीठ घालून परतून घ्या. पत्ताकोबी जास्त शिजवू देऊ नये.

त्यात वाफवलेला भात घाला. भात घातल्यानंतर त्यावर मॅगी मसाला पाव चमचा घाला आता आपण जे सोयाबीन फ्राय केलेले आहेत ते भातामध्ये मिक्स करून घ्या.

भाताला एक वाफ येऊ द्या. आता गॅस बंद करा. आणि त्यावर चिरलेली कोथिंबीर घाला. आता आपल्या सोयाबीन राईस तयार झालेला आहे.

मी येथे कुठल्याही सॉसेसचे वापर केलेला नाही. (आपल्याला आवडत असल्यास दोन चमचे सोयासॉस एक चमचा टोमॅटो सॉस एक चमचा रेड चिली सॉस तुम्ही भातामध्ये घालू शकतात.)


टिप्स::

बासमती भात शिजवताना तुम्ही पातेल्यामध्ये शिजवू शकतात भात गचका होणार नाही. भाताचे दाणे मोकळे मोकळे शिजतील त्यावर थोडे साजूक तूप सोडा म्हणजे भात मोकळा होईल.


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ:२० मिनिटे
एकूण वेळ :४०मिनिटे परिमाण :दोन व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4330

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.