तांदळाची खीर
प्रस्तावना ::
तांदळाची खीर ही देवीच्या नैवेद्यासाठी किंवा कुठल्याही देवतांच्या नैवेद्यासाठी ठेवली जाणारी तसेच सर्वांना आवडणारी पचनास हलकी अशी आहे. लहान मुलांना तांदळाची खीर तर अत्यंत आवडते.
साहित्य::
- एक वाटी तांदूळ अर्धी वाटी साखर ,
- २ वाट्या दूध,
- चार वेलचीची पूड,
- १० बदाम
- १० काजू
- २ चमचा तूप,
- मीठ
- पाणी
कृती:
एक वाटी तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावे. तांदूळ हे पंधरा मिनिटे भिजत घालावे.
नंतर आपण भिजत घातलेले तांदूळ ज्याप्रमाणे भात शिजवतो त्याप्रमाणे शिजवायला ठेवावे.
मात्र आपण भाताला पाण्याचे प्रमाण कमी घालतो आणि त्यामध्ये जास्त मीठ घालतो.
मीठ यामध्ये अगदी चिमूटभर घालावे आणि पाण्याचे प्रमाण जास्त ठेवावे. कुकर लावल्यानंतर त्याच्या साधारण तीन शिट्ट्या होऊ द्या .कुकर चा गॅस बंद करा.
कुकर मधली वाफ निघाल्यानंतर त्यामधील शिजलेला भात काढून घ्या.
तो भात अत्यंत मऊ असा रवीने लोणून घ्या. गॅसवर एका पातेल्यामध्ये २ चमचाभर तूप घाला.

तूप गरम झाले की त्यामध्ये लोणलेले भाताची पेस्ट घाला त्यामध्ये दूध घाला.
साखर घाला खीर ला चांगल्या उकळ्या येऊ द्या पाच मिनिटे उकड्या आल्यानंतर मंद आचेवर खीर शिजू द्या.
त्यामध्ये वेलचीची पूड घाला आणि पुन्हा शिजवून घ्या. काजू बदाम चे काप करा.

ते खीर मध्ये घाला. आपली तांदळाची खीर तयार आहे.
चला तर मग आपण पुरणपोळ्यांसोबत तांदळाची खीर खाऊयात.
ही खीर लहान मुलांना खायला देऊ शकतात कारण ही पचनास अत्यंत हलकीफुलकी असते .
यामध्ये टाकलेले काजू-बदामचे काप न करता त्याची मिक्सरमध्ये पूड करावी लहान मुलांना पचना सोपे जाईल.

टिप्स::
तांदळाची खीर ही आपण साध्या चपाती सोबत तसेच पुरणपोळी सोबत खाऊ शकतो. यामध्ये मी तांदूळ वीस मिनिटे भिजत घातले आहेत त्यामुळे तांदूळ अत्यंत मऊ शिजतात कारण आपल्याला खिरीसाठी तांदूळ हे मऊ हवेत.
वेळ व परि माण::
तयारीची वेळ: २५ मिनिटे
एकूण वेळ: ४० मिनिटे
परिमाण: ४ जणांसाठी
