झटपट तयार होणारा मक्याचा चिवडा

by Vaishali Chaudhari
2 views

झटपट तयार होणारा मक्याचा चिवडा


प्रस्तावना:::

छोटी सी भूक!!!!
काय असते छोटीशी भूक जी लहान मुलांना लागलेली असते… झटपट काहीतरी हवा… आणि ती पण खमंग चटपटीत असे हवे…. तर त्यासाठी हा झटपट होणारा मक्याच्या पोह्यांचा चिवडा….


साहित्य:::

  • एक वाटी मका पोहे
  • दहा ते बारा कडीपत्त्याची पाने
  • दहा ते बारा शेंगदाणे
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा तिखट
  • पाव चमचा पिठीसाखर
  • चवीप्रमाणे मीठ
  • चाट मसाला
  • तळण्यासाठी तेल

कृती:::

सर्वप्रथम तेल गरम करून घ्या… कडकडीत असे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता तळून घ्या… कढीपत्ता तळून झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे तळून घ्या….

त्यानंतर मक्याचे पोहे थोडे थोडे तळून घ्या…. सर्व मक्याचे पोहे तळून झाल्यावर एका ताटामध्ये काढा….

या सर्व मक्याचे पोहे शेंगदाणे कढीपत्ता यावर पाव चमचा हळद पाव चमचा तिखट चवीप्रमाणे मीठ आणि चाट मसाला घाला…

आणि सर्व मक्याचे पोहे व्यवस्थित एकत्र करून घ्या… त्यावर पिठीसाखर घाला…. चाट मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात…

चटपटीत आंबट गोड असे मक्याचा पोह्यांचा चिवडा लहान मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी द्या….

लहान मुले अत्यंत खुश होतील… कुरकुरीत खमंग चटपटीत असा मक्याचा चिवडा तयार आहे…


वेळ व परिमाण::
तयारीची वेळ ::५मिनिटे
एकूण वेळ ::२०मिनिटे

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7477

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.