थोडक्यात
ही खांदेशी भागातील हिरवी पातळ भाजीचा प्रकार आहे
साहित्य

- अर्धी वाटी तुरीची दाळ
- 5 जाड हिरवी मिरची
- बारीक हिरवी लहान मिरची
- अर्धी लहान वाटी शेगदाणे
- 6 लसूण पाकळ्या
- छोटा अद्रक तुकडा
- 2 चिमटी हळद
- मीठ
- फोडण्यासाठी तेल
- जिरे, मोहरी
- कोथीबिर
कृती
प्रथम तुरीची डाळ धुवून घ्या
कुकरमध्ये तुरीची डाळ
जाड हिरव्या मिरचीचे तुकडे करून घाला

ज्या प्रमाणे वरण शिजवितो त्या प्रमाणे शिजवा
तव्यावर, बारीक मिरची व शेगदाणे भाजून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची ,शेंगदाणे लसूण, अद्रक, कोथीबिर पाणी घालून चटणी वाटून घ्या
एका कढईत तेल घालून जिरे, मोहरी तडतडली की चटणी तेलात घाला
चटणीत हळद घाला
चटणीला तेल सुटे पर्यन्त परतवा

नंतर त्यात तुरीकी डाळ चे वरण चटणीत घाला त्यात आवडीनुसार पाणी घाला
त्यात चवीप्रमाणे मीठ घाला नंतर चार ते पांच उकळ्या येवू दया बारीक गॅस करून झाकण अर्धे ठेवावे त्यामुळे भाजीला तेल सूटते
भाजी तयार आहे

टिप्स
भाजीला तेल सुटण्यासाठी अर्धे झाकण ठेवावे, कारण पूर्ण झाकण ठेवल्याने तेल भाजीत मुरून जाते
वेळ व परिमाण
तयारीची वेळ 10 मिनिटे
एकूण वेळ 40 मिनिटे
परिमाण 5 झण
