लहान मुलांचे डब्यावाली झटपट कोरडी शेव भाजी
प्रस्तावना: लहान मुलांना झटपट काय देता येईल हा प्रश्न मोठा पडतो . ही शेव भाजी आपण झटपट तयार करू शकतो आणि मुलांनाही ती खूप आवडते.

साहित्य:

- १ वाटी शेव,
- १ वाटी चिरलेले कांदा,
- १ वाटी चिरलेले टोमॅटो,
- ४ लसूण पाकळ्या,
- कोथिंबीर,
- पाव चमचा तिखट,
- २ चिमुटभर हळद,
- मीठ,
- पाणी,
- फोडणीसाठी तेल
१ वाटी चिरलेले कांदा, १ वाटी चिरलेले टोमॅटो,४ लसूण पाकळ्या, कोथिंबीर, पाव चमचा तिखट,२ चिमुटभर हळद, मीठ, पाणी,फोडणीसाठी तेल
कृती:
एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला. त्यामध्ये लसणाची काप घाला. त्यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो घाला. आता कांदा टोमॅटो सर्व परतून घ्या. परतलेल्या मिश्रणामध्ये हळद आणि तिखट घाला. सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्या. परतवलेल्या मिश्रणामध्ये एक वाटी भर गरम पाणी घाला.
त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला.
पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये शेव घाला.
एक उकळी आल्यानंतर लगेचच गॅस बंद करा. शेव लगेच शिकतात. त्यावर चिरलेली कोथिंबीर घाला. आपली कोरडी शेवभाजी तयार आहे.

टिप्स:
शेव पाण्यात टाकल्या नंतर जास्त शिजवू नका कारण त्याचा भाजी तील शेव विरघळू शकतात.
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ: ५ मिनिटे
एकूण वेळ: १० मिनिटे
परिमाण: १ मुलासाठी
