गुळाच्या पाकाचि तिळाची वडी

प्रस्तावना::
तिळाची वडी हा पारंपारिक पदार्थ असून हा पूर्वापारपासून केला जाणारे आणि संक्रांतीला बनवल्या जाणारा गुळाचा पदार्थ आहे. ह्या वड्या संक्रांतीला वाण म्हणून वाटल्या जातात. तसेच एकमेकांना खाऊ घालून गोडवा निर्माण केला जातो. तीळ आणि गुळाचे मिश्रण हे थंडीमध्ये आरोग्यदायी असते.
साहित्य::

* एक वाटी तीळ
*एक वाटी गूळ
*एक चमचा साजूक तूप
कृती::
सर्वप्रथम तीळ निवडून स्वच्छ करून घ्यावे. ती तीळ उन्हामध्ये चांगली कडकडीत वाळवून घ्यावी. कढई गरम करून त्यावर तीळ मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावे.

तीळ अति जास्त ही भाजू नये कारण तिळामध्ये कडसरपणा निर्माण होतो. आपल्याला सतत हलवत अशी तीळ भाजून घ्यावी.
तीळ ताटामध्ये काढून घ्यावे. इतका कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालून गरम करून घ्यावे. त्यामध्ये एक वाटी गूळ घालावा. गॅसची आस मंद करून घ्यावे.

मंद आचेवर गुळाचा पाक करून घ्यावा. गुळाचा पाक हा त्यामध्ये फेस आल्यानंतर पाक तयार झाला असे समजावे.
किंवा एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पाकाचा थेंब टाकावा. पाकाची गोळी झाल्यास पाक तयार झालेला आहे असे समजावे.
कारण पाक जर कच्चा राहिला तर वड्याला बनता तीळ गुळाचा चुरा तयार होईल. म्हणून पाक हा व्यवस्थित झालेला हवा.
पाकाला व्यवस्थित फेस सुटलेला असतो त्यामध्ये आपण भाजलेले तीळ घाला. आता अल्टी पलटी करून व्यवस्थित तीळ गुळाच्या पाकामध्ये घोळवून घ्या.

आता ओट्याला तूप लावून घ्या. किंवा पोळीपाटाला तूप लावून घ्या. यावर तीळ गुळाचे पाकाचे मिश्रण घाला. लाटण्यालाही तुपाचा हात लावून घ्या ,यामुळे लाटण्याला तिळगुळाचे मिश्रण चिपकत नाही.
पोळीपाट लाही आपण त्यासाठीच तूप लावून घेतले की जेणेकरून आपण जी वडी बनवणार आहे ती त्याला चिपकणार नाही. आता मिश्रणाचा गोळा त्यावर घाला आणि आजूबाजूने गोल करून घ्या.
आता व्यवस्थित गोल झाल्यानंतर पटापट ती गोळी लाटून घ्या. पातळ सर अशी पोळी लाटा. हे मिश्रण पटापट लाटावे लागते नाहीतर लगेचच चुकून जाते.

त्यामुळे वड्या थोड्या जाड होऊ शकतात. मिश्रण घातल्या घातल्यास गरम गरमच पटापट लाटायला सुरुवात करावी हाताने थापताना हाताला थोडे तूप लावावे.
(येथे मी वडि लाटताना ओट्या वर लाटलेली आहे कारण ओट्यावरती पटापट लाटली जाते सगळा बाजूने लांबवता येते आणि लाटायला सोपी ही जाते. कारण पोळीपाटा वर लाटल्यास थोडी जाडसर होऊ शकते.)
त्यामुळे मिश्रण हाताला चिकटणार नाही व आपल्याला गरम चटका लागणार नाही. कारण गुळाचा चटका हा अत्यंत त्रासदायक असतो.

आता आपली तीळ गुळाची पोळी तयार झाल्यानंतर त्यावर सुरीच्या साह्याने लांब रेषा मारून घ्या आणि त्याचे चौकोनी काप येतील अशा ही रेषा मारा.

आता त्याच्या हळूहळू सराटा खालच्या साईडने घालून वड्या वरती उचकून घ्या. त्याचे व्यवस्थित तुकडे पाडून घ्या आता आपल्या याच्या वड्या तयार आहे.

चला तर खाऊ या मग तिळाच्या वड्या…………….
टिप्स::
गुळाचा पाक करताना गूळ ज्यावेळेस आपण कढईमध्ये घालतो तो पटापट हलवावा कारण गुळ हा कढईला चिटकून लालसर होऊ शकतो. हा लाल सर गुड वडीमध्ये कडसरपणा निर्माण करतो. आणि तीळही कमी प्रमाणात भाजा जास्त वाजलेली तीळही कडू लागते.
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ: २० मिनिटे
परिमाण:३ व्यक्तीसाठी
