खुसखुशीत नानकटाई कणकेची | गव्हाच्या पिठाच्या नानकटाई |Nankatai | Easy Nankatai Recipee |

by Vaishali Chaudhari
41 views

खुसखुशीत नानकटाई कणकेची | गव्हाच्या पिठाच्या नानकटाई |Nankatai | Easy Nankatai Recipee

प्रस्तावना::

आपण नेहमी मैद्याच्या नान कटाई बघत असतो. मैदाच्या नानकटाई या नरम येतात.. आणि गव्हाच्या पिठाच्या नानकटाई थोड्या कडक येतात परंतु त्या अधिक पौष्टिक असतात…


साहित्य:::

खुसखुशीत नानकटाई कणकेची | गव्हाच्या पिठाच्या नानकटाई |Nankatai | Easy Nankatai Recipee |
  • एक वाटी सपाट गव्हाचे पीठ (कणिक)
  • अर्धी फुल वाटी तूप
  • अर्धी वाटी पिठीसाखर
  • पाव कप बेसन
  • इथे सर्व साहित्य मेजरींग कपने मेजर केलेले आहे..


कृती::

एका मोठ्या काचेच्या बाऊलमध्ये न पातळ केलेले ना जास्त घट्ट असे साजूक तूप(इथे तुम्ही वनस्पती घेता सुद्धा वापर करू शकतात वनस्पती तुपामुळे नानकटाइ एकदम मऊ येतील..) घाला. हे तू विस्करच्या साह्याने चांगले मऊ होईपर्यंत फेटा …

खुसखुशीत नानकटाई कणकेची | गव्हाच्या पिठाच्या नानकटाई |Nankatai | Easy Nankatai Recipee | – फोटो 2


तुपाचा रंग पांढराशुभ्र होईल.. आणि ते फेसकटल्यासारखे होईल. त्यामध्ये पिठीसाखर घाला.

आणि विस्करच्या साह्याने पाच ते दहा मिनिटे चांगले मऊ लोण्याप्रमाणे होईपर्यंत फेटत रहा. मऊ स्पंज असा गोळा तयार होईल.

तूप आणि साखर स्पंजी झाल्यानंतर त्यामध्ये कणिक (बसेल इतकी)बेसन घाला आणि त्याचा एक गोळा मळून घ्या..

खुसखुशीत नानकटाई कणकेची | गव्हाच्या पिठाच्या नानकटाई |Nankatai | Easy Nankatai Recipee | – फोटो 3

(त्याचा गोळा तयार करण्यासाठी थोडे दोन चमचे दूध घाला. )एक वाटी कणीक प्रमाण सपाट वाटी घ्यायची आहे फुल भरून घ्यायची नाही.

कारण कणिक जास्त झाल्यास गोळा मळता येणार नाही. किंवा त्यामध्ये बसेल एवढीच कणीक तुम्ही त्यामध्ये मळा..

खुसखुशीत नानकटाई कणकेची | गव्हाच्या पिठाच्या नानकटाई |Nankatai | Easy Nankatai Recipee | – फोटो 4

कारण आपला सॉफ्ट असा गोळा तयार झाला पाहिजे..आता याचा गोळा तयार झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे हातावर गोळे करून घ्या.

त्यानंतर छोटे छोटे गोळ्या केल्यानंतर त्याला चिपट असा आकार द्या.. याप्रमाणे सर्व गोळ्याचे लहान असे गोळे करून घ्या.

खुसखुशीत नानकटाई कणकेची | गव्हाच्या पिठाच्या नानकटाई |Nankatai | Easy Nankatai Recipee | – फोटो 5

त्यावर बदाम आणि काजूचे काप लावा. आता ओवन 180° वर प्री-हीट करून घ्या.. ओवन प्री हिट केल्यानंतर साधारण तीन ते चार मिनिटे नानकटाई डिशवर ठेवून बेक करून घ्या.

तसेच आपल्याकडे ओव्हन नसल्यास आपण कुकरमध्ये सुद्धा या नानकटाई बेक करू शकतो ..कुकरमध्ये मीठ घाला…

साधारण एक वाटी मीठ खाली तळाशी घाला आणि ते पसरवून घ्या.. आणि गॅस चालू करा त्यामध्ये स्टॅन्ड ठेवा ..

एका डिशवर साधारण पाच ते सहा नानकटाई ठेवा आणि स्टँडवर ही डिश ठेवा साधारण चार ते पाच मिनिटे झाकण ठेवून नानकटाई बेक होऊ द्या..

गॅसची आच एकदम मंद ठेवा.. पाच मिनिटे झाल्यानंतर नानकटाई चांगल्या फुलून आलेल्या असतील.. आता आपल्याला बेक झालेल्या असतील…

खुसखुशीत नानकटाई कणकेची | गव्हाच्या पिठाच्या नानकटाई |Nankatai | Easy Nankatai Recipee | – फोटो 6

ओव्हनमधील नानकटाई सुद्धा लगेचच होतात जास्त वेळ आपण होऊ दिल्यास त्याला जास्त तांबूस रंग येतो..

किंवा त्या जळकटही होऊ शकतात.. गव्हाच्या पिठाची नानकटाई ही थोडी कडक असते.. (पण इथे आपण वनस्पती तूप जर वापर केल्यास त्याच नान कटाई मऊ येतात)..

पण आरोग्यासाठी साजूक तूप उत्तम असते.. आणि चवीला अतिउत्तम लागतात….. मैदाच्या नानकटाई या एकदमच मऊ लागतात …

पुढच्या रेसिपी मध्ये मी मैद्याच्या नानकटाई सुद्धा दाखवणार आहे… चला तर मग आता आपण पौष्टिक कणकेच्या नानकटाई एन्जॉय करूया…


टिप्स::

इथे आपण तूप विस्करच्या साह्याने फेटल्यानंतर आपल्या तुपामध्ये जेवढे बेसन पूर्ण घाला परंतु कणिक जेवढी बसेल तेवढेच पीठ त्यामध्ये मळा ..जेणेकरून मिश्रणाचा गोळा तयार होईल.. ही टीप नक्की लक्षात ठेवा… तुम्हाला दुधाची गरजच पडणार नाही…

वेळ व परिमाण::


तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ :४०मिनिटे
परिमाण ::चार व्यक्तींसाठी २० नानकटाई

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.