क्रंची असेल लागणारे व्हेज मंचुरियन
प्रस्तावना::
लहान मुलं बऱ्याचदा भाजी पोळी खात नाही अशा वेळेस काहीतरी नवीन पदार्थ बनवायचा असतो… तर आपण हा चायनीज पदार्थ आज आपण बनवणार आहे मंचूरियन… शिवाय यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व भाज्या वापरल्या जातात ज्याच्या मधून बरेचसे विटामिन आपल्याला मिळतात….
मंचुरियन बॉल्स बनवण्यासाठी साहित्य::: दीड किलो पत्ताकोबी अर्धा किलो गाजर पाव किलो सिमला मिरची पाव किलो कांद्याची पात आठ ते दहा हिरव्या मिरच्या एक वाटी लसूण पाकळ्या दोन ते तीन इंच अद्रकाचा तुकडा एक ते दीड वाटी मैदा एक ते दीड वाटी कॉर्नफ्लॉवर एक चमचे सोया सॉस एक चमचे टोमॅटो सॉस एक चमचे रेड चिली सॉस एक चमचे ग्रीन चिली सॉस दोन चमचे शेजवान सॉस दहा मिरे घेऊन त्याची पूड मीठ आणि एक चमचा तिखट तळण्यासाठी तेल
बॉल्स बनवण्याची कृती:::
पत्ताकोबी किसून घ्यायची आहे… गाजर सुद्धा आपल्याला किसून घ्यायचे आहे. कांद्याची पात बारीक चिरून. पाव किलो सिमला मिरची बारीक चिरून घ्यायची आहे. एक वाटी लसूण आणि अद्रक आणि मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे… आता ही पेस्ट झाल्यानंतर आपण सर्व ज्या भाज्या चिरलेल्या सिमला मिरची कांद्याची पात किंवा किसलेल्या पत्ता कोबी गाजर या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहे त्यामध्ये अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घालायची आहे… आता या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला… तसेच एक चमचा तिखट घाला…. एक चमचा सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस दोन चमचे शेजवान सॉस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे…. सुरुवातीला एक एक वाटी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालून गोळा करून घ्यायचा आहे… गोळा जर तयार होत नसेल तर तुम्ही थोडा मैदा आणि थोडं कॉर्नफ्लॉवर पुन्हा घालू शकता… मिश्रणाचा चांगला गोळा झाला की त्याची आपल्याला गोल गोल असे बॉल्स करून घ्यायचे आहे…. सर्व मिश्रणाचे बॉल्स तयार करून झाले की मग… कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून घ्या… त्या तेलामध्ये दहा ते बारा बॉल्स घालून चांगले तांबूस रंगावर तळून घ्यायचे आहे… हे बॉल्स मध्यम आचेवर तळायचे आहे… साधारण एक बॅच तळण्यासाठी पाच ते दहा मिनिटे लागतात… कारण आपल्याला एकदम मंद आचेवर हे तळायचे आहे.. अशा खुप सार्या बॅचेस आपल्याला तळून घ्यायच्या आहेत… सर्व बॉल आपले या पद्धतीने तळून घ्यायचे आहे…. आपले मंचूरियनचे क्रंची असे बॉल्स तयार झालेले आहे…. हे बॉल्स बराच वेळ नरम पडत नाहीत…..
मंचूरियन ची ग्रेव्ही चे साहित्य::: पाव किलो पत्ता कोबी पाच ते सहा कांदे दोन सिमला मिरची रेड चिली सॉस दोन चमचे ग्रीन चिली सॉस अर्धी वाटी शेजवान सॉस चार ते पाच चमचे कॉर्नफ्लॉवर एक चमचा तिखट चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा मिरे पूड आणि पाणी परतण्यासाठी तेल
ग्रेव्ही बनवण्याची कृती::: पत्ताकोबी येथील लांब चिरून घ्या… कांदाही लांब चिरून घ्या… सिमला मिरची सुद्धा आपल्याला लांब चिरून घ्यायची आहे.. अर्धी वाटी लसणाची काप करायचे आहे… अद्रक किसून घ्यायचे आहे… कढईमध्ये तेल गरम करा… तेल गरम झाले की त्यामध्ये अद्रक आणि लसूण परतून घ्या… त्यामध्ये सिमला मिरची परतून घ्या… त्यानंतर आपल्याला कांदा आणि पत्ता कोबी परतवून घ्यायची आहे… सर्व भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही… अगदी थोडेच आपल्याला परतायचे आहे… त्यानंतर हे मिश्रण काढून घ्या… कढईमध्ये पुन्हा थोडे तेल घ्या त्यामध्ये रेड चिली सॉस सोया सॉस ग्रीन चिली सॉस शेजवान सॉस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यामध्ये पाणी घाला त्यानंतर त्यामध्ये पेस्ट घाला… आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या… आपल्याला मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे… कारण कॉर्नफ्लॉवरच्या लगेचच गाठी होऊ शकतात… यामध्ये थोडे पाणी घालायचे आहे आणि एक चमचा तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे… इथे आपण विनेगार किंवा अजिनोमोटो चा वापर केलेला नाही… आता यामध्ये अर्धा चमचा मेरी पूड घालायची आहे…. कढईमधील मिश्रण काढून घ्या… थोडे मिश्रण कढईमध्ये ठेवा त्यामध्ये पत्ताकोबी सिमला मिरचीचे परतवलेले थोडे मिश्रण घाला… घातल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घ्या त्यामध्ये दहा ते बारा मंचुरियन बॉल्स घाला…. आपले मंचुरियन तयार झालेले आहे…. या पद्धतीने तुम्ही बॅचेस मध्ये मंचुरियन तयारी करू शकतात… सर्व मंचूरियन एकदा तयार करण्याची गरज नाही… एकदा मिश्रणामध्ये सर्व मंचूरियन घातले तर मंचुरियन बॉल्स नरम होतील… आपण थोडे थोडे तिघं मिश्रण एकत्र करून मंचूरियन तयार करून घेऊ शकतात…. आपले ड्राय मंचुरियन आता तयार झालेले आहे….. तर मग एन्जॉय करूया ड्राय मंचुरियन….
टिप्स:::
मंचुरियन बॉल्स अगदी कुरकुरीत राहण्यासाठी एक वाटी पोहे पाण्यातून फक्त धुवून घ्या… आणि आपण ज्यावेळेस मंचुरियन बॉल्स चे मिश्रण भिजवतो त्यामध्ये पोहे घाला आणि मिश्रणाचा गोळा तयार करून घ्या हे बॉल साधारण पाच ते सहा तास क्रंची राहू शकतात….
वेळ व परिमाण:::
तयारीची वेळ :३० मिनिटे
एकूण वेळ :६० मिनिटे परिमाण ::15 व्यक्तींसाठी
