मस्त मिलन शेक
प्रस्तावना:::
टरबूज खरबूज( डांगर) म्हणजेच मस्त मेलन ही पण उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात येतात… त्यापासून वेगवेगळ्या रेसिपी तयार करून ठेवू शकता.. राहण्यासाठी आपण या फळांचा जास्त वापर करावा यामधून आपल्याला पाण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात मिळते आणि शरीर थंडगार राहण्यास मदत होते….

साहित्य:::

- दोन पोळी खरबुजाच्या सोलून त्याचे काप केलेले
- दोन चमचे साखर
- एक वाटी दूध
- खरबुजाच्या सोललेल्या बिया
कृती:::
सर्वप्रथम खरबूज दोन कापून घ्या.. यातील फक्त आपण दोनच फोडींचा शेक करणार आहे… साधारण एक ते दीड ग्लास इतका तयार होतो….
दोन खरबुजाच्या फोडी त्याचे काप करून घ्या… आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काप घालून त्याची पेस्ट करून घ्या….

फेस केल्यानंतर दोन चमचे इतकी साखर घाला…. साखर घातल्यानंतर त्यामध्ये एक वाटी दूध घाला…. आणि मिक्सरमध्ये शेक फिरवून घ्या…..

आता हा शेक ग्लासमध्ये काढून घ्या… त्यानंतर तुम्हाला हा शेक पातळ हवा असल्यास तुम्ही एक वाटी पेक्षा दीड वाटी दूध यामध्ये घालू शकतात त्यानंतर तुम्ही यामध्ये बर्फाचे क्यूब घाला….
म्हणजे शेक. थंडगार होईल… आता या शेक मध्ये खरबुजाच्या सोललेल्या बिया घाला…. त्यामध्ये स्ट्रॉ घालून लहान मुलांना पाहिला द्या….

उन्हाळ्यामध्ये हा थंडगार शेक थंडगार दिलासा देतो.., तर तुम्ही हा सोपा असा शेक नक्की करून बघा…. वरून तुम्ही बारीक कट करून खरबुजाचे तुकडे सुद्धा घालू शकतात….
हे खरबुजाचे तुकडे आपल्या शेकची चव वाढवतात….. त्यानंतर तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम सुद्धा घालू शकतात यामुळे आपल्या खरबूज शेख ची चव भन्नाट लागेल…
मी इथं आईस्क्रीम घातलेला नाही पण तरीसुद्धा हा शेक भन्नाट लागतो……

टिप्स:::
खरबुजाच्या तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवा त्यावेळेसच तुम्ही त्यामध्ये दूध घालू शकता दूध अगदी थंडगार वापरावे गरम दुधाचा वापर करू नये फळांमध्ये कधीही गरम दूध वापरू नये दूध फाटण्याची शक्यता असते….
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:: १०मिनिटे
एकूण वेळ::२० मिनिटे
परिमाण: १ग्लास
