बदाम शेक कॅरमल वापरून तयार केलेला प्रकार नंबर २

by Vaishali Chaudhari
0 views

बदाम शेक कॅरमल वापरून तयार केलेला प्रकार नंबर २


प्रस्तावना:::

बदाम शेक प्रकार आपण पहिलेही बघितला आहे पण त्यामध्ये आपण साखरेचा वापर केलेला होता… कॅरमल घातल्यामुळे बदाम शेकला वेगळाच रंग येतो तशीच वेगळीच चव येते…. बासुंदी सुद्धा आपण अशाच कॅरॅमल चा वापर करू शकतो….


साहित्य:::

  • अर्धा लिटर दूध
  • अर्धी वाटी साखर
  • अर्धी वाटी बदाम
  • दोन चमचे कस्टर्ड पावडर


कृती:::

अर्धा लिटर दुध गरम करून घेऊया.. एका वाटीमध्ये कस्टर्ड पावडर आणि त्यामध्ये थोडे दूध घालून त्याची पेस्ट करून घ्या…..

ती पेस्ट घातल्यानंतर ती दुधामध्ये घाला…. दुधामध्ये कस्टर्ड पावडर घातल्यानंतर सतत ढवळत रहा दूध घट्ट होईल…

तोपर्यंत एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये अर्धी वाटी साखर घालून ती विरघळून घ्या…. आणि कॅरॅमलाईज करून घ्या…

म्हणजेच पातळ करून घ्या साखर सतत ढवळत राहायची आहे तिला जळू द्यायची नाही नाहीतर त्याच्यामध्ये कडसळपणा निर्माण होईल…..

आता हे कॅरॅमल तयार झाले आहे ते कॅरमल दुधामध्ये विरघळून घ्या आणि दूध सतत ढवळत रहा हे कॅरमल दुधामध्ये विरघळल्यानंतर गॅस बंद करा…
कॅरमल पूर्णपणे दुधात विरघळलेले हवे… त्यानंतर त्यामध्ये बदामाचे काप घाला… व्हिडिओ दाखवताना बोलताना माझ्याकडून बदामाच्या ऐवजी काजू म्हटले गेलेले आहे…

पण इथे आपल्याला बदामाचाच वापर करायचा आहे कारण आपण बदाम शेक बनवत आहे…. आता हा बदाम शेक दोन तेतीन तास थंड होण्यासाठी ठेवून फ्रिजमध्ये ठेवा…..

आणि आता तुम्ही ग्लासामध्ये हा बदाम शेक काढून घ्या त्यामध्ये तुम्ही कुठलाही आईस्क्रीम घालू शकतात …..

मावा आईस्क्रीम किंवा काजू पिस्ता आईस्क्रीम तुम्हाला जो फ्लेवर आवडेल तो आईस्क्रीम तुम्ही घालू शकतात मी इथे बाबा आईस्क्रीम चा वापर केलेला आहे…

आईस्क्रीम नाही घातला तरी चालेल असाही तुम्ही बदाम शेक घेऊ शकता… चला तर मग थंड थंडगार एन्जॉय करूया बदाम शेक!!!!!


टिप्स:::

कॅरमल तयार करताना साखर सतत ढवळत राहावी कारण ती जर कढईला चिकटली तर ती जळू शकते आणि आपल्या बदाम शेकला किंवा बासुंदीला जळका वास येऊ शकतो…. कॅरमल चा वापर केल्यामुळे एक वेगळी टेस्ट आपल्याला बदाम शेक मध्ये येईल आणि रंग सुद्धा सुंदर येईल….


वेळ व परिमाण:::


तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ :३०मिनिटे
परिमाण :दोन व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

8519

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.