रेसिपी नाव (Racipe Name)::
चमचमीत खान्देशी भरल्या वांग्याची भाजी!!Spicy Brinjal Sabji
फोटो (Photo)::
प्रस्तावना (Introduction)::
भरल्या वांग्याची भाजी ही एकदम चमचमीत आणि झणझणीत बनते… चव तर अशी असते की ती भाजी खातच राहावी…. ही भाजी तुम्ही वरण भातासोबत किंवा चपाती सोबत सुद्धा बनवू शकतात….
गरमागरम ही भाजी तर अगदी तोंडाला चवच आणून टाकते…. आणि त्यातला मसाला तर एकदम झक्कास लागतो….. जाड बारीक मसाला त्यामुळे चव एकदम अप्रतिम!!!!
साहित्य (Ingridident)::

- पाव किलो जांभळे वांगे
- एक वाटी शेंगदाणे
- सात ते आठ लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
- कोथंबीर
- फोडणीसाठी तेल
- जिरे मोहरी
- पाव चमचा हळद
- पाव चमचा गरम मसाला
- एक चमचा धना पूड
- दोन चमचे लाल तिखट झणझणीत वाले
- चवीप्रमाणे मीठ
कृती (Procedures)::
सर्वप्रथम वांगे धुऊन चिरून घ्या.. मागील वांग्याची दांडी काढून घ्या तसेच मधून दोन क्रॉस च्या आकारामध्ये आपल्याला वांगी चिरून घ्यायची आहे….
आता ही वांगी आपल्याला कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून एक शिट्टी घेऊन शिजवून घ्यायची आहे…. जास्त शिट्टी आपल्याला घ्यायची नाही कारण वांगे एकदम गजगतीत होतील…

दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही पातेल्यात एक ते दीड ग्लास पाणी घालून वाफवून घेतले तरी चालतील…. आपल्याला फक्त नरम होतील इतपत आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत….
मसाला ची कृती: (Preparation of Masala):::
सर्वप्रथम तवा गरम करून घ्या त्यावर शेंगदाणे घाला शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्या…. शेंगदाणे भाजल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याची साल काढायची असली तर आपण काढू शकतो….

पण मी इथे लालच भाजी करायची असल्यामुळे शेंगदाण्याची साल तशीच राहू देणार आहे…. चवही अगदी अप्रतिम लागते…
मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे लसूण पाकळ्या अद्रकाचा तुकडा एक चमचा धनापूड दोन चमचे तिखट पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ पाव चमचा जिरे या सर्वांचे जाडसर भरडा करायचा आहे…

या चटणी मध्ये आपल्याला पाणी घालायचे नाहीत आपल्याला कोरडा भरडा तयार करायचा आहे….. आपला मसाला आता तयार झालेला आहे आता आपण हा वांग्यांमध्ये भरणार आहे….
भाजीची कृती (Preparation of Sabji)::
आता वांगे काढून घ्या… आणि आपण वांगे कापलेले आहेत त्यामध्ये आपण जो मसाला तयार केलेला आहे तो प्रत्येक वांग्यामध्ये थोडा थोडा करून भरून घ्या …..

भरपूर असा मसाला वांग्यामध्ये आपल्याला भरायचा आहे…. सर्व वांगे याच पद्धतीने भरून घ्या… नंतर कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा….

त्यामध्ये जिरे मोहरीचे फोडणी घाला आणि आपण जी वांगी मसाल्याने भरलेली आहे ती वांगी त्या तेलामध्ये घाला….

आणि छान तीन ते चार मिनिटे तेलामध्ये वांगे परतवा द्या…. तुम्हाला अजून तिखट आवडत असल्यास अजून एक चमचा तिखट तुम्ही झणझणीतपणासाठी घालू शकतात…..
उरलेला सर्ब मसालाभाजीत घाला …..

नंतर यामध्ये साधारण अर्धा ग्लास गरम पाणी घाला… आणि चवीप्रमाणे मीठ घाला आणि छान दोन ते तीन उकळ्या याला येऊ द्या…..

त्यानंतर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला…. गरमागरम अशी आणि झणझणीत अशी आपली भरल्या वांग्याची भाजी आता तयार झालेली आहे ….

ही भाजी तुम्ही भाकरी सोबत किंवा चपाती सोबत किंवा पोळी सोबत सुद्धा खाऊ शकतात…. गरमागरम भरल्या वांग्याची झणझणीत अशी भाजी!!!

टिप्स (Tips):::
वांगी वाफवताना खूप शिट्ट्या होऊ देऊ नका नाहीतर वांगी जास्त शिजल्यामुळे आपल्याला वांगी भरता येणार नाही त्यामुळे अगदी एक शिट्टी होतात कुकर गॅसच्या खाली उतरवून घ्या …..
आणि वाफ निघाल्या निघाल्या लगेचच वांगे पाण्यातून काढून घ्या…. नाहीतर दुसऱ्या पद्धतीने तुम्ही वांगे पातेल्यामध्ये शिजवू शकतात….
वेळ आणि परिमाण::
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ:: ३०मिनिटे
परिमाण:: २व्यक्तींसाठी
टॅग्स Tags/Keyword::
, #SwaadGharCha, #IndianMeals, #GharKaKhana, #MaharashtrianThali, #MarathiFood, #HomemadeRecipe
अशाच अजून racipe
