
प्रस्तावना खमंग खुसखुशीत खान्देशी वरण बट्टी,डाळ बट्टी
वरण बट्टी व घोटलेली वांग्याची भाजी हा खान्देशामधील पारंपारीक पदार्थ, मेनू इतका महत्वाचा आहे कि हा मेनू पाहुणचार,लग्नकार्य, समारंभ, देवांचे भंडारे यामध्ये आवर्जून केला जाणारा जिन्नस आहे.हा मेनू अत्यंत रुचकर असा आहे,
साहित्य (Ingredients)
- बट्टी १ किलो पीठ दळून (चरमर) [बट्टीचे पीठ कसे तयार करतात या साठी येथे क्लिक करा https://swaadgharcha.com/batti-pith/ ]
- २ वाटी तूर डाळ,
- मीठ,
- हळद,
- १ चमचा ओवा,
- तळणासाठी तेल,
- पाणी
पाककृती (Steps)
पहिली पद्धत बट्टी

बट्टीचे पीठ परातात घेऊन त्यावर २ चिमटी हळद घालून, १ चमचा ओवा, चवीप्रमाणे मीठ घाला. पीठामध्ये १ वाटी तेल घालून चांगले चांगले मोहन द्यावे लाडू होईल इतपत घाला.

पाणी घालून कड़क कणकेचा गोळा करून घ्या. त्याचे छोटे गोळे करून घ्या.

नंतर कुतूरमध्ये पाणी घाला बट्टी वाफवून 8 शिट्ट्या ‘घेऊन वाफवून घ्या.

नंतर तूर डाळ धुवून डाळ कुकरमध्ये लावा
नंतर ३ शिट्या होऊ दया.
थंड झोले की वरण घोटून त्यात चिमूटभर हळद, व चवीप्रमाणे मीठ घाला,
बट्टी कुकरमधुन काढून घ्या, त्या थंड होऊ दया. बट्टी थंड होऊ द्या कारण बट्टी थंड न झाल्यास आपण काप करताना त्याचे दाणे पडतील किंवा भूगा होईल.
थंड झाल्या की त्याचे काप करून घ्या.
कढाईत तळण्यासाठी तेल गरम करा.

सर्व बट्टया तांबूस रंग होईपर्यंत तळून घ्या.
वरण बट्ट्टी तयार आहेत,
छान पैकी बट्टी चूरून घ्या आणि त्यामध्ये गरमागरम वरण घ्या. त्यावर साजूक असे तूप घ्या. वरण बट्टी अत्यंत रुचकर लागेल.
दुसरी पद्धत लोळगे
(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे.बट्टी करताना वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो. जशी की आपण बट्टी येथे वाफवून घेतली आहे आणि ती नंतर तळून घेतली आहे.
पण बऱ्याच पद्धतीने मध्ये बट्टी ज्याला की आपण लोळगे म्हणतो हे लोळगे गावाकडे कणिक भिजवल्यानंतर त्याचे मोठे मोठे लोळगे गोल करून ते शेणाच्या गौ-र्यांमध्ये भाजले जातात. असे हे खरपूस लोळगे वरणासोबत अत्यंत रुचकर लागतात.
लोळगे हा प्रकार मोठ्या प्रमाणावर गावाकडे समुदायाचे भोजन असल्यास केला जातो . किंवा गावाकडे घरोघरी केल्या जाणार आहे हा पदार्थ आहे कारण तिथे शेणाच्या गौ-र्या उपलब्ध असतात. आपण घरीही याप्रमाणे लोळगे करू शकतो
आपल्याला हे लोळगे मोठे न करता छोट्या आकारांमध्ये करू शकतो हे लोळगे भाजताना आपल्याकडे गौ-र्या नसल्यास एक कढई मध्ये तूप गरम करून त्यामध्ये हे लोळगे एक ते तास भाजावे लागतात .ते सारखे पंधरा पंधरा मिनिटांनी अल्टी पलटी करून भाजावे लागतात .
लोळगे वरतून झाकण ठेवल्याने हे वाफेवर चांगले भाजले जातात. आणि अल्टी पलटी केल्यामुळे त्या सगळ्या बाजूने ते भाजले जातात. खास करून वरण बट्टी चे जेवण गणपतीच्या उत्सवात दिले जाते. गणपतीचा भंडारा देवीचा भंडारा यावेळेस भोजनामध्ये वरण बट्टी व घोटलेली वांग्याची भाजीचा मेनू असतो. खास करून खानदेशामध्ये लग्नाच्या जेवणामध्ये स्पेशली हळदीच्या कार्यक्रमामध्ये वरण बट्टी वांग्याची भाजी हा मेनू असतो.
तिसरी पद्धत दाल बाटी
तसेच तिसरी पद्धत आपण ज्याप्रमाणे बट्टी वाफवून घेतली त्यानंतर ती बट्टी कापून घेतली होती. पण हीच बट्टी छोट्या आकारात गोल गोल गोळे करून वाफवून घ्यावी व तुपामध्ये तळून घ्यावी. आणि ती पुन्हा तुपात बुडवून खाण्यास द्यावी ही बट्टी अत्यंत रुचकर असते राजस्थान भागामध्ये अशी बाटी(बट्टी) केली जाते आणि ती फोडणीच्या वरणासोबत खाल्ली जाते. त्याला दाल बाटी असेही म्हटले जाते. या बट्टीचा गूळ घालून चूरमा देखील केला जातो. आपण पुढील रेसिपी मध्ये सूर्मा बघणारच आहोत.)
टिप्स (Cooking Tips)
ट्टी कुकरमधुन काढल्यावर त्या थंड होऊ दया. बट्टी थंड होऊ द्या, बट्टी थंड न झाल्यास आपण काप करताना त्याचे दाणे पडतील किंवा भूगा होईल,
फोडणीच्या वरणासोबत खाल्ली जाते.
वेळ व परिमाण
• तयारीची वेळ: १० मिनिटे
• शिजवण्याची वेळ: ३५ मिनिटे
• एकूण वेळ: ५० मिनिटे
निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी
हा पदार्थ आरोग्यदायी, झटपट आणि पारंपरिक चवीचा आहे. नक्की करून बघा!
घोटलेली वांग्याची रुचकर भाजी कशी बनवायची या साठी येथे क्लिक करावे
