उपवासाची चमचमीत मिरची भाजी Fast Spicy Mirch Sabji
प्रस्तावना/Introduction:::


आपण यापूर्वी सुद्धा उपवासाची एक भरलेली मिरची बघितली होती पण आपल्याला जर झटपट मिरची बनवायची असल्यास ही पद्धत एकदम सोपी पडेल….. आणि चवीलाही एकदम चमचमीत लागेल….. आणि कळणारही कमी वेळ लागेल आणि कमी मेहनत लागेल…. कधी कधी खूप घाई असते अशा वेळेस ही रेसिपी तुम्हाला कामाला येईल…. उपवासाला खूप पदार्थ बनवायचे असतात त्यामुळे हा पदार्थ झटपट कसा तयार होईल ते आपण बघू….
साहित्य/ Ingridident::::

- 250 ग्रॅम ढोबळी मिरची
- अर्धी वाटी शेंगदाणे
- एक चमचा जिरे
- चवीप्रमाणे मीठ
- फोडणीसाठी तेल
कृती/Procedure:::::
सर्वप्रथम ढोबळ मिरची ही स्वच्छ धुऊन घ्या आणि तिचे मागील नाकेही तसेच ठेवा….
फक्त थोडे थोडे नाकी कट करून घ्या….
आता या मिरच्या छानशा मधून व्यवस्थित कापून घ्या…

या पद्धतीने सर्व मिरच्या आपण मधून कापून घेऊ त्याचे दोन दोन तुकडे करू…..
त्यानंतर तव्यावर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्या….
शेंगदाणे भाजल्यानंतर त्याची साल काढून घ्या…
साल काढल्यानंतर शेंगदाण्याचे जाडसर कूट करून घ्या…..
इथे तुम्ही शेंगदाण्याचे कूट घातले नाही तर भाजीची चव जरी चांगली लागत असली तरी त्याच्यामध्ये काहीतरी कमी होते….
त्यामुळे शेंगदाण्याचे कूट घातल्यानंतर भाजीला एक वेगळी चव आणि एक मसाला तयार होतो जो की चवीला एकदम अप्रतिम लागतो….
आता तुम्ही कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घाला तेल कडकडीत गरम होऊ द्या….

गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे घाला ….
जिरे चांगले तडतडल्यानंतर मग त्यामध्ये मिरच्या घाला….
मिरच्या घातल्यानंतर साधारण पाच ते सहा मिनिटे चांगल्या वाफ येऊ द्या….
अधून मधून मिरच्या ढवळत रहा…. त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला इथे मी तुम्हाला तिखटाचा वापर नाही सांगितला आहे परंतु कधीकधी मिरच्या ह्या चवीला फिक्या असतात….

अशा वेळेस तुम्ही अर्धा चमचा ती त्याचा वापर यामध्ये करू शकतात…..
आता आपल्या मिरच्या चांगल्या वाफलेल्या किंवा शिजलेल्या आहेत आता यामध्ये आपण शेंगदाण्याचे कूट घालून आणि त्यावर झाकण न ठेवता दोन मिनिटे परतून घेऊ…..

बिचा छान अशा परतलेल्या आहे आणि त्याला रंगही खूप छान आलेला आहे…..
क्या करपूस मिरच्या आपल्याला साबुदाण्या सोबत किंवा भगर च्या खिचडी सोबत खाऊ शकतो….

रोजच्या जेवणामध्ये सोबत खाण्यासाठी वापर करू शकतात…..
किंवा कधी भाजी नसल्यास ऑप्शन म्हणून ह्या उपवासाच्या मिरच्या तुम्ही चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतात…..

तर आपल्या उपवासाच्या खमंग अशा मिरच्या तयार झालेल्या आहेत…..
चमचमीत उपवास मिरची!!!!
टिप्स/Tips::::
गरमागरम असा उपवासाच्या मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत या मिरच्या तयार करत असताना आपल्याला डोळ्या मिरचीचा वापर करायचा आहे जेणेकरून एकदम ठसका जाणार नाही किंवा अति तिखट लागणार नाही कारण या मिरच्या आपल्याला साबुदाण्या सोबत किंवा भगरच्या खिचडी सोबत खायच्या आहेत पण बऱ्याच लोकांना खूप चमचमीत पदार्थ आवडतात त्यामुळे तुम्ही यामध्ये झणझणीत असे एक चमचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता…..
वेळ आणि परिमाण Time and Quantity
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण::४ व्यक्तीसाठी
#उपवासाचीमिरचीभाजी #चमचमीतमिरचीभाजी #उपवासाचीभाजी #उपवासाचेपदार्थ #उपवासाचीरेसिपी #चटपटीतभाजी #मिरचीभाजी #महाराष्ट्रीयनरेसिपी #मराठीरेसिपी #उपवासस्पेशल #SwaadGharcha #FastMirchSabji #SpicyMirchSabji #UpvasRecipe #FastingRecipe #VratRecipe #FastingFood #GreenChilliRecipe #MaharashtrianFood #IndianRecipes
टॅग्स Tags

DalBatiRecipe DesiKhandeshi DesiKhandeshiZaiqa Diwali Faral Diwali Sweets easy homemade recipe GavrooranFood Homemade Flour homemade recipe Homemade Sweets Indian Snacks Indian Sweets Indian Traditional Sweets Indian Vegetarian Recipes JalgaonFood KalnyachiBhakri khandesh-special KhandeshiFlavors KhandeshiFood KhandeshiRecipes KhandeshiShevBhaji KhandeshiVangyacheBharit KhandeshiVaranBatti KhandeshiZanazanit KhandeshiZatpat KhandeshSpecial Maharashtrian food Maharashtrian Recipe MaharashtrianRecipe Maharashtrian Recipes MaharashtrianRecipes MaharashtrianThali Marathi recipe Marathi Recipes MarathiSwayampak ShevBhaji Swaad GharCha sweet Traditional Diwali Recipes Traditional Indian Sweets TraditionalMarathiFood VaranBatti {mar} recipe घरगुती रेसिपी मराठी रेसिपी





