घोटलेली वांग्याची भाजी

प्रस्तावना
घोटलेली वांग्याची भाजी ही खान्देश भागातील एक प्रसिद्ध झणझणीत, झटपट होणारी भाजी आहे, जी वांग्यांना शिजवून, घोटून, मसाले आणि इतर साहित्य घालून बनवली जाते. ही भाजी अनेकदा वरण-बट्टी सोबत दिली जाते. तसेच हे व्यंजन लग्न कार्यात तसेच हळद या कार्यांमध्ये आवर्जून केली जाते खानदेश भागात हा सगळ्यात आवडतीचा मेनू आहे.
साहित्य:-
- अर्धा किलो वांगे,
- २ लसणाचे कांदे,
- अर्धा इंच आले/ अद्रक तुकडा,
- आठ बारीक हिरवी मिरची,
- १ चमचा धणे,
- मीठ,
- तेल,
- पाणी
- 2 चिमटी हळद
- अर्धा चमचा गरम मसाला,
- कोथींबीर
कृती :-
वांगे धुवून चिरुन घ्या, वांगे गरम पाण्याने चांगले धुवून घ्या. (वांगी चांगली धुतल्यानंतर आपण ते पातेल्यामध्ये उकडून घेऊ शकतो आणि उकडलेले पाणी फेकून द्यायचे त्यामध्ये असणाऱ्या जाड बिया निघून जातात तसेच वांग्यांमध्ये असलेला कडवटपणा ही निघून जातो.)
आले (अद्रक) -लसूण- मिरचीची पेस्ट करा.
नंतर कढाईत चार पळी तेल टाकवे.
तेलात आल -लसूण मीरची पेस्ट घाला व नंतर हळद घाला.
पेस्ट मध्ये थोडी धणे पावडर करून घाला,
थोडा गरम मसाला टाकावा.येथे गरम मसाला कोणता वापरायचा आपण घरी केलेला सुद्धा गरम मसाला वापरू शकतो. किंवा रेडिमेट वाला गरम मसाला सुद्धा आपण वापरू शकतो यामुळे भाजीला टेस्ट चांगली येते.
चिरलेले वांगे घालून छान हलवा वरुन झाकण ठेवा,
वांगे एकदम नरम होइपर्यंत शिजवा. असं वाटत असल्यास वांग्याची भाजी शिजत नाही आपण कुकरमध्ये घालून दोन ते तीन शिट्या घेऊ शकतो. यामुळे वांग्याची भाजी चांगली शिजेल. व घोटण्यास सोपे होईल
शिजलेली त्यात चवीप्रमाणे मिठ चिरलेली कोथींबीर घाला.
वरणाच्या रविने पुन्हा उकळ आले आली.
भाजी घोटून घ्या .वरण बट्टी सोबत ही वांग्याची भाजी सोबत तोंडी लावू शकतात किंवा बट्टी भाजी आपण खाऊ शकतो.घोटलेली वांग्याची भाजी तयार आहे
टिप्स :-
वांगे हे गरम पाण्याने दोन-तीन वेळेस धुवून काढा. त्यामुळे भाजी कडवट लागणार नाही.इथे आपण मोठ्या वांग्यांचा सुद्धा वापर करू शकतो कारण छोट्या वांग्यांमध्ये कडवटपणा असतो. जी वांगी आपण भरताना वापरतो ती वांगी सुद्धा पण वापरू शकतो त्यामुळे भाजी रुचकर तर होतेच पण कळवटपणा थोडाही राहत नाही. वांग्याच्या भाजीमध्ये ही दोन प्रकार असतात हिरव्या मिरच्यांची वांग्याची भाजी आणि लाल मिरचीची वांग्याची भाजी इथे आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे आपण हिरवी वांग्याची भाजी केलेली आहे.
वेळ व परिमाण
तयारीचा वेळ २० मिनीटे
एकूण वेळ – ४० मिनीटे
परिमाण ५ जणांसाठी
