बटाट्याचा पराठा

by Vaishali Chaudhari

बटाट्याचा पिवळा पराठा


प्रस्तावना:


लहान मुलांना वेगवेगळ्या रंगांमध्ये पराठे आवडतात म्हणून हा पिवळा पराठा यापूर्वी आपण पांढरा पराठा पहिला आहे.

  • साहित्य:
  • २ बटाटे,
  • २ हिरव्या मिरच्या,
  • ८ लसूण पाकळ्या,
  • अर्धा इंच अद्रक तुकडा,
  • कोथिंबीर,
  • ३ चिमूटभर हळद,
  • मीठ,
  • तेल
  • भिजवलेली नरम कणकेचा गोळा

कृती:


२ बटाटे कुकरमध्ये वाफवून घ्या.
वाफवल्यानंतर त्याचे साल काढून त्याला कूच करून घ्या.अद्रक, हिरवी मिरची ,लसणाची पेस्ट करून घ्या. एका कढईमध्ये थोडे तेल घालून त्यात अद्रक, मिरची-लसणाची पेस्ट घाला. ती परतून घ्या. त्यात कुस्करलेला बटाटा घाला. चवीप्रमाणे मीठ घाला. कोथिंबीर घाला.
पाच पराठे होईल इतपत मऊ कणिक मळून घ्या.
कणकेचा गोळा करून त्यात पूर्ण प्रमाणे ही तयार झालेली भाजी भरून घ्या. त्याचा पराठा लाटून घ्या.
पराठा तव्यावर शेकताना दोघं बाजूने त्याला तेल लावा.


हा बटाट्याचा पराठा चिंचेची चटणी किंवा टोमॅटोचा सॉस यासोबत आपण खाऊ शकतात.


टिप्स:


लहान मुलांना वेगवेगळ्या रंगात असलेले पराठे खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही यात रंगाचा वापर न करता थोडं बीट चा वापर करू शकतात.


वेळ व परिमाण:


तयारीची वेळ: २० मिनिटे
एकूण वेळ: ४० मिनिटे
परिमाण: १ जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.