बटाट्याची मसाले भाजी

by Vaishali Chaudhari

बटाट्याची मसाले भाजी


प्रस्तावना::


मसाले भाजी म्हटली की सर्वांनाच तोंडाला पाणी सुटते. मसाल्याची भाजी ही पूर्वीपासून केली जाणारी.. आणि सर्वांना आवडणारी झणझणीत अशी पूर्वी या भाजीचा मसाला पाट्यावर वाटला जायचा त्याची भाजी तर एकदमच झक्कास लागायचे आता आपण मिक्सरमध्ये वाटण करतो.

साहित्य::


  • दोन कांदे
  • वीस खोबऱ्याचे काप
  • दोन बटाटे
  • एक मोठा टोमॅटो
  • दहा लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • पाव चमचा हळद
  • दोन चमचे तिखट
  • एक चमचा धने पूड
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • पाव चमचा लाल गरम मसाला
  • कोथिंबीर
  • फोडणीसाठी तेल
  • मीठ
  • पाणी

कृती::

सर्वप्रथम आपण कांदे सोलून घेणार आहोत ती चिरून घेणार आहोत. आता एक टोमॅटो घेऊन बारीक चिरून घ्या.

खोबऱ्याचे बारीक असे वीस काप करून घ्या. खोबऱ्याचे काप केल्यानंतर तवा गरम करून त्यावर कांदा आणि खोबरं तांबूस रंग पर्यंत भाजून घ्या.

कांदा आणि खोबरं भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा खोबरं दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रकाचा तुकडा तिखट घालून वाटण करून घ्या.

त्याची बारीक अशी चटणी करून घ्या. त्यामध्ये पाणी घाला आणि बारीक चटणी वाटा. एका साईडला कुकरमध्ये दोन बटाटे उकडून घ्या.

ते बटाट्याची साल काढून त्याचे काप करून घ्या. कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा. कडकडीत तेल झाल्या नंतर त्यामध्ये आपण वाटलेली चटणी घालूया.

त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतवा. ही चटणी चांगली परतवून घ्या. चटणी सलग परतवत राहा .

त्यामध्ये हळद गरम मसाला तसेच धने जिळे पूड लाल गरम मसाला घालून चटणीचे मिश्रण चांगले परतून घ्या.

आता आपल्या चटणीच्या मिश्रणाला चांगले तेल सुटलेले आहे. तेल सुटले म्हणजे आपली चटणी तयार होत आली आहे.

त्यामध्ये उकडलेल्या बटाट्याचे काप घाला आणि पुन्हा परतवून घ्या. आता या मिश्रणामध्ये साधारण एक ग्लास गरम पाणी घाला.

गरम पाणी घातल्यानंतर भाजी चांगली चमच्याने हलवून घ्या. पाणी आपल्या गरजेप्रमाणे घालावे आपल्याला भाजी घट्ट आवडत असल्यास एक ग्लास पाणी पुरेसे आहे.

आणि आपल्याला भाजी थोडी पातळ हवी असल्यास साधारण दीड ग्लास पाणी घालावे. भाजीवर झाकण ठेवावे .

त्यामुळे भाजीला तेल सुटते झाकण हे अर्धवट ठेवावे भाजी पूर्ण झाकून दिल्यास भाजीला तेल सुटत नाही. साधारण पाच मिनिटे भाजी शिजू द्या .

भाजीला चांगल्या उकळ्या येतील. आता यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ घाला आणि चिरलेली कोथिंबीर घाला.

पुन्हा भाजीला दोन ते तीन उकळ्या येऊ द्या आता भाजीचा गॅस बंद करा. बटाट्याची भाजी तयार झालेली आहे.

बटाट्याची भाजी तुम्ही चपाती सोबत किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत बाजरीच्या भाकरी सोबत खाऊ शकतात किंवा भातासोबतही तुम्ही खाऊ शकतात..….


टिप्स:::

आपण इथे चटणी करताना कांदा आणि खोबरं भाजून घेतलेले आहे कारण त्यामधील कचवटपणा निघून जातो आणि चटणी पटकन परतवली जाते.

वेळ व परिमाण::


तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ :३०मिनिटे
परिमाण :२व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4330

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.