दोडक्याची कोरडी भाजी

by Vaishali Chaudhari
234 views

दोडक्याची कोरडी भाजी.


प्रस्तावना:

दोडक्याची कोरडी भाजी


दोडक्याची भाजी ही पारंपारिक भाजी असून ही सर्वांना आवडणारी भजी आहे दोडक्याची चटणी सुद्धा केली जाते आणि यामध्ये लोह मॅग्नेशियम पोटॅशियम फायबर्स ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.


साहित्य:

दोडक्याची कोरडी भाजी – फोटो 2
  • पाव किलो दोडके
  • पाच हिरव्या मिरच्या
  • दहा ते बारा लसूण पाकळ्या
  • अर्धी वाटी शेंगदाणे,
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा तिखट
  • पाव गरम मसाला
  • जिरे
  • फोडणीसाठी तेल
  • मीठ


कृती::

सर्वप्रथम दोडके स्वच्छ धुऊन घ्या आणि दोडक्यांवरच्या शिरा काढून घ्या त्यात सोलून घ्या आणि मग दोडके चिरून घ्या .

दोडके च्या शिरा काढण्या आवश्यक आहे त्याचे सालही काढावेच लागते त्यानंतर मग ते कापावे. हिरव्या मिरचीचे काप करून घ्या.

तसेच लसूण पाकळी सोलून त्याचे काप करून घ्या. तव्यावर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्या आणि त्याचे कूट करून घ्या.

आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे घाला लसणाची काप घाला आणि परतवून घ्या.

दोडक्याची कोरडी भाजी – फोटो 3

त्यानंतर मिरची घालून परतून घ्या. मिरचीचे काप घातल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा तिखट घाला आणि गरम मसाला घाला.

ही सर्व साहित्य घातल्यानंतर चांगले परतून घ्या. मसाला परतवल्यानंतर त्यामध्ये कापलेले दोडक्याचे काप घाला.

आता भाजी पुन्हा परतून घ्या चांगली सात-आठ मिनिटे झाकण ठेवून भाजी वाफवून घ्या. झाकण ठेवल्यामुळे भाजी चांगली वाफली जाते आणि ती नरम होते.

भाजी चांगली वाफल्यानंतर त्यामध्ये आपण दाण्याची कूट घालूया दाण्याची कूट घालून भाजी चांगली परतवून घ्या .

आणि आपल्या चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घाला. यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला आणि एक वाफ येऊ द्या. भाजी चांगली व्यवस्थित नरम झाली की मग गॅस बंद करा.

दोडक्याची कोरडी भाजी – फोटो 4

आता आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे….

दोडक्याची भाजी तुम्ही चपाती ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी या सोबत तुम्ही खाऊ शकतात.


टिप्स::

दोडक्याच्या शिरा जर आपण काढल्या नाहीत तर दोडके लवकर शिजत नाहीत…

वेळ व परिमाण::


तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ :३०मिनिटे
परिमाण :१व्यक्तींसाठी

दोडक्याची कोरडी भाजी

दोडके, शेंगदाणे, लसूण आणि मिरचीच्या वाटणातून तयार होणारी ही कोरडी भाजी चपाती किंवा भाकरीसोबत छान लागते. डब्यासाठीही ती सोयीची आहे.

बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • दोडक्याची कडक शिरा सोलून फोडी करा; कोवळे दोडके निवडा.
  • लसूण, मिरची आणि शेंगदाण्याचं कूट तेलात परतल्यावर दोडके घाला.
  • पाणी कमी घाला; दोडक्याला स्वतःलाच पाणी सुटतं.
  • झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा आणि शेवटी थोडा वेळ उघडी ठेवून कोरडी करा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

दोडके कडू लागले तर?

कडू दोडके वापरू नका. फोडी थोडं चाखून पाहा.

भाजी जास्त पाणचट झाली तर?

उघडी ठेवून आटवा.

सोबत काय खावं?

चपाती, भाकरी किंवा वरण-भातासोबत.

You may also like

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.