पोकळ्याची कोरडी भाजी

by Vaishali Chaudhari
371 views

पोकळ्याची कोरडी भाजी

पोकळ्याची कोरडी भाजी


प्रस्तावना::

पोकळ्याची कोरडी भाजी ही हिरव्या पालेभाज्यांमध्ये येते. तसेच त्यामध्ये पौष्टिकता खूप असते .

साहित्य::

पोकळ्याची कोरडी भाजी – फोटो 2
  • एक पोकळ्याची जोडी
  • सहा हिरव्या मिरच्या
  • आठ ते दहा लसूण पाकळ्या
  • जिरे मोहरी
  • फोडणीसाठी तेल
  • हळद पाव चमचा
  • धने पूड पाव चमचा
  • तिखट पाव चमचा
  • मीठ
  • शेंगदाण्याचे कूट एक चमचा



कृती ::

सर्वप्रथम पोकळ्याची भाजी तोडून घ्या त्याची पाने तोडून घ्या आणि दांड्यांच्या शिरा काढून घ्या आता ही भाजी स्वच्छ धुऊन घ्या.

दोन ते तीन पाण्यामधून स्वच्छ धुऊन घ्या भाजी बारीक चिरून घ्या. तसेच मिरचीचे काप करून घ्या आणि लसणाचेही काप करून घ्या.

एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला. त्यामध्ये लसूण चे काप मिरच्यांचे काप घालून परतून घ्या.

पोकळ्याची कोरडी भाजी – फोटो 3

मिरच्या तांबूस रंगावर झाल्या की त्यामध्ये पोकळ्याची भाजी घाला. पोकळ्याची भाजी घालून चांगले परतून घ्या मंद आचेवर झाकण ठेवून भाजीला वाफ येऊ द्या.

नंतर झाकण काढून घ्या भाजीला पाणी सुटलेले असेल. आता ही भाजी चे पाणी आटेपर्यंत आपण भाजी शिजू देऊ.

भाजीचे पाणी आटल्यानंतर पाव चमचा हळद पाव चमचा धने पूड पाव चमचा तिखट घालून चांगले परतून घेणार आहोत त्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ घाला.

पोकळ्याची कोरडी भाजी – फोटो 4

आता भाजीचे पाणी पूर्णपणे आटू द्या भाजी व्यवस्थित परतून घ्या. भाजी परतल्यानंतर शेंगदाणे भाजून घेऊन त्याचे मिक्सरमध्ये कूट करून घ्या.

एक चमचा कूट भाजीमध्ये घाला भाजी पुन्हा परतवून घ्या आता आपली भाजी चा गॅस बंद करा. पोकळ्याच्या भाजीमध्ये आपण कुठलेही मसाले घालत नाही.

पोकळ्याची कोरडी भाजी – फोटो 5

कारण ही भाजी अत्यंत साधी सरळ सोपी आहे. ही पालेभाजी असल्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले घालायचे नाही त्यामुळे त्याची पौष्टिकता टिकून राहते.

आपली पोकळ्याची भाजी तयार झालेली आहे… ही पोकळ्याची भाजी तुम्ही पोळी सोबत किंवा भाकरी सोबत खाऊ शकतात…..

पोकळ्याची कोरडी भाजी – फोटो 6

टिप्स ::

पोकळ्याची भाजी करताना भाजीच्या दांड्या व्यवस्थित तोडून घ्याव्या त्यातील शिरा व्यवस्थित काढून घ्याव्या. जाड दांड्या घेऊ नये बारीक दांड्यांच्या शिरा काढाव्या त त्याच फक्त भाजी वापरावे.

वेळ व परिमाण::
तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ:२० मिनिटे
परिमाण :२व्यक्तीसाठी

पोकळ्याची कोरडी भाजी

पोकळा ही पावसाळ्यातली पालेभाजी आहे. लसूण, मिरची, धने पूड आणि शेंगदाण्याच्या कुटासह केलेली कोरडी भाजी भाकरी आणि चपातीसोबत चविष्ट लागते.

बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • पोकळा नीट निवडून, धुऊन आणि बारीक चिरून घ्या.
  • लसूण-मिरचीची फोडणी तेलात खमंग परता.
  • पालेभाजी शिजताना पाणी सोडते; म्हणून वेगळं पाणी घालू नका.
  • शेंगदाण्याचं कूट शेवटी घाला; भाजी कोरडी आणि चवदार होते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

भाजी पाणचट झाली तर?

झाकण काढून आटवा आणि शेंगदाण्याचं कूट थोडं वाढवा.

भाजी हिरवी कशी राहील?

जास्त वेळ शिजवू नका.

सोबत काय खावं?

भाकरी, चपाती किंवा वरण-भातासोबत.

You may also like

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.