इडली

by Vaishali Chaudhari
0 views

इडली


प्रस्तावना:::

इडली हा साउथ इंडियन पदार्थ घरी असला तरी आपल्याकडेही आवडीने खूप खाल्ला जातो… आणि नाश्त्याला तर आवर्जून हा तयार केल्या जाणारा पदार्थ आहे… आपली इडली मऊ कशी होईल याची पद्धत आपण आता बघणार आहे आणि त्यासाठी किती प्रमाण घ्यायचे तेही आपण बघणार आहे…


साहित्य :::

  • तीन वाटी जाड तांदूळ
  • एक वाटी उडदाची डाळ
  • मीठ
  • दोन चमचे तेल
  • सोडा अर्धा लिंबू


कृती:::

तीन वाट्या तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या आणि एका पातेल्यामध्ये भिजत घाला… १ वाटी डाळ धुऊन घ्या आणि भिजत घाला ……….

त्यानंतर तांदूळ आणि डाळ सात ते आठ तास आपल्याला रात्रभर भिजवायचे आहे.. सकाळी उठल्यानंतर आपण तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुऊन घ्या…

मिक्सरमध्ये डाळ आणि तांदुळाचे बारीक असे मिश्रण वाटून घ्या… त्यामध्ये पाणी घालून मिश्रण पातळ करा त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला आणि दोन पळ्या तेल घालून चांगले मिश्रण फेटून घ्या…


मिश्रण एकदम पाच ते दहा मिनिटे फेटून घ्या…. आता पाच तास कमीत कमी आपल्याला हे मिश्रण फरमेंट होण्यासाठी ठेवायचे आहे…

त्यानंतर संध्याकाळी आपण याच्या इडल्या बनवू शकतो… इडली बनवताना त्यामध्ये दोन एक चिमूट एका सोडा घाला आणि त्यावर अर्धा लिंबू पिळा…

थोड्या ऍक्टिव्हेट झाल्यानंतर तो मिश्रणामध्ये हळुवारपणे मिक्स करून घ्या.. तुमची इडलीचे रमण एकदम सॉफ्ट बनवून तयार होईल..

आता इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळण्यास ठेवा त्यानंतर इडली पत्राला तेल लावून घ्या आणि बॅटर त्यामध्ये घाला…

दहा ते पंधरा मिनिटं वाफ होण्यासाठी ठेवा… दहा ते पंधरा मिनिटे झाल्यानंतर बाहेर काढा… च्या पाच मिनिटे थंड होऊ द्या..

चमच्याच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने तुम्ही इडली काढून घ्या… आणि सांभाराणी चटणी सोबत सर्व्ह करू शकतात..

सांभाराची रेसिपी मी पहिले दाखवलेली आहे…. तसेच चटणीची रेसिपी सुद्धा पहिले दाखवलेली आहे….
गरमागरम इडली तयार आहे….


टिप्स:::

इडलीच्या रौनामध्ये आपण सोडा ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण लिंबाचा वापर केला आहे… यामुळे तुमचे मिश्रण एकदम सॉफ्ट होईल..


वेळ व परिमाण:::
तयारीची वेळ:: ३०मिनिटे
एकूण वेळ::: ६०मिनिटे
परिमाण::५ जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

8089

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.