वांग्याचे भरीत

by Vaishali Chaudhari
738 views

रेसिपीचं नाव: खान्देश स्पेशल वांगे भरीत

हे खांदेशी व्यंजन अतिशय रुचकर

साहित्य [Ingredients]

  • १ किलो भरताचे वांगे,
  • आठ जाड मिरच्या,
  • १० शेंग‌दाणे,
  • ४ बारीक मिरची,
  • १० लसूण पाकळ्या
  • १०० ग्रॅम तेल,
  • ओवा, जीरे
  • कांदयाची पात,
  • कोथींबीर
  • १०० ग्रम तेल,
  • चिमूटभर, मीठ चवीप्रमाणे,
  • बडगी-ठेचणी

कृती (Steps)

भरताचे वांगे धुवून घ्या.

घराच्या बाहेर एक चूल मांडून त्यामध्ये लाकडी घालून ती पेटवून घ्या त्यावर एक जाळी ठेवा. जाळीवर वांगे ठेवा. वांगी नरम पडतील व बाहेरून वांग्याची साल काळी दिसेल इतपत भाजून घ्या.गॅसवर, चुलीवर वांगे ठेवून छान नरम होईपर्यंत भाजून घ्या.

वांगे डिशमध्ये काटुन साल काढून ध्या.

नंतर, चुलीवरच्या कोळशांमध्ये मिरच्या घाला त्या सतत हलवत राहा त्या भाजल्या जातील चुलीवरच्या मिरच्यांचे भरताची चव काही वेगळीच लागते. आपण तव्यावर सुद्धा या मिरच्या भाजून घेऊ शकतो.एका बडगीमध्ये मिरच्या लसूण, मीठ घालून बारीक ठेचून ठेचा करणे

नंतर या ठेच्यामध्ये आपण जी वांगे सोललेले आहेत ती घालून चांगली बारीक असे ठेचून घ्यावे वांगी बारीक ठेचल्याने भरताचे दोरे राहत नाही. वांगी सुलताना वांग्यातले तेल वाया जाऊ देऊ नये ते तेल वांग्याच्या भरतात घालावे लागते त्यामुळेच भरीत अत्यंत रुचकर बनते.साल काढलेले (सोललेले ) वांगे ठेचून घ्या. भरीत चांगले ठेचून ठेचा घ्या.

कढईत तेल घालून जीरे फोडणी घाला आणि मग त्यात चिरलेले कांदयाची पात शेंगदाणे घालून परतवा

नंतर ठेचलेले भरीत घालून चांगले. ५ मिनीटे परतवा.

त्यात चिरलेली कोशीबीर घाला. गरमागरम भरीत तयार आहे.गरमागरम भरता सोबत आपण कळण्याची भाकरी, कळण्याची पुरी ,तसेच साधी पुरी खाऊ शकतो त्यासोबत आमसूल ची कढी असली तर खूपच छान मेनू होईल. आमसूल ची कडी आपण लवकरच बघूयात पुढच्या रेसिपी मध्ये.

(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहेभारताची वांगी हे ऑगस्ट पासून सुरू होतात ते फेब्रुवारी पर्यंत असतात. वांगी निवडताना वांग्याला दाबले जाईल इतपत ते नरम असावे जास्त मोठे वांगी घेतल्यास त्यामध्ये जाड बिया निघतात.त्या बियांचा पोटाला त्रास होऊ शकतो. भरता सोबत तेलातल्या तळलेल्या मिरच्याही आपण खाऊ शकतो. दह्यातली कोशिंबीर तसेच तळलेले पापड इत्यादी खाल्ले जातात. खानदेश भागामध्ये भरताच्या मोठ्या पार्ट्या होतात. भरीत पार्टी म्हटली म्हणजे ती शेतातच आणि चुलीवरचे भरीत. चुलीवरची भरीत म्हटले की कसे तोंडाला पाणी सुटते बघा तर मग. वांगी भाजल्यानंतर वांग्यामध्ये जे पाणी निघते त्यामुळे भरीत लुसलुशीत बनते व भरीत तळताना त्यामध्ये तेलाचा वापर जास्त करावा त्यामुळे भरीत रुचकर लागते.)

टिप्स (Cooking Tips)

सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)

भाकरी, कळणा भाकरी सोबत , पुरी , कळणा पुरी व चपाती रुचकर लागते.

वेळ व परिमाण

• तयारीची वेळ: १० मिनिटे
• शिजवण्याची वेळ: १५ मिनिटे
• एकूण वेळ: २५ मिनिटे
• परिमाण: २ जणांसाठी

निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी

हा पदार्थ आरोग्यदायी, झटपट आणि पारंपरिक चवीचा आहे. नक्की करून बघा!

पौष्टिक मूल्य: फायबर भरपूर प्रमाणात,व्हिटॅमिन B1, B6, पोटॅशियम, मॅग्नेशियम अँटीऑक्सिडंट्सपौष्टिक मूल्य: फायबर भरपूर प्रमाणात,पचनासाठी चांगले फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
काही लोकांना वांगे अॅसिडिटी किंवा अलर्जी देऊ शकते.
किडनी स्टोन असलेल्या लोकांनी मर्यादित प्रमाणात खावे (ऑक्सलेट्समुळे).

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7507

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.