भेंडीची भाजी

by Vaishali Chaudhari

भेंडीची भाजी


प्रस्तावना:

भेंडीची भाजी ही पूर्वी पूर्वीपासून केली जाणारी व लहान मुलांना सर्वात आवडती भाजी आहे.


साहित्य:

  • पाव किलो भेंडी,
  • पाच हिरव्या मिरच्या,
  • सात ते आठ लसूण पाकळ्या,
  • फोडणीसाठी तेल,
  • जिरे मोहरी,
  • मीठ


कृती:

सर्वप्रथम पाव किलो भेंडी स्वच्छ धुऊन घ्या. भेंडीला कोरडी करून घ्या. भेंडी कोरडी केल्यानंतर बारीक बारीक गोल काप करून घ्या.

तुम्हाला आवडत असल्यास लांबोळे काप केले तरी चालतील मी इथे गोल काप केलेले आहे. लसूण आणि हिरव्या मिरचीचे ही काप करून घ्या.

एका कढईमध्ये तेल गरम करा. तेल चांगले कडकडीत गरम झाले की मग त्यात जिरे मोहरीची फोडणी घाला.

त्यामध्ये लसूण आणि मिरची चे काप घाला. मिरच्या तांबूस रंगावर परतल्यानंतर कापलेल्या भेंडी घाला. भेंडीवर साधारण तीन मिनिटे ठेवा.

भेंडी आपण लोखंडी कढईमध्ये करू शकतो त्यामुळे आपल्याला थोडेफार लोह प्राप्त होते. किंवा आपल्याकडे असेल त्या कढईमध्ये आपण भेंडी बनवू शकतो
मी इथे दोन्ही कडईंचा वापर केलेला आहे.

भेंडी परतून घ्या. भेंडी परतल्यानंतर त्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ घाला. मीठ घातल्यानंतर भेंडी पुन्हा परतवून घ्या .

साधारण पाच मिनिटे मंद आचेवर भेंडी शिजू द्या. आता मात्र भेंडीवर झाकण ठेवायचे नाही. आता भेंडीमध्ये चिरलेली कोथिंबीर घाला.

आपली भेंडी तयार झालेली आहे. भेंडी ही तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा पोळी सोबत तुम्ही खाऊ शकतात. चल आता मैत्रिणींनो आपली भेंडीची भाजी आता तयार झालेली आहे….

भेंडी म्हटली की लहान मुलांना अत्यंत प्रिय रोज जरी भेंडी दिली मुलांना तरी ते आवडीने खातात. पण त्यामध्ये वेगवेगळे प्रकार हवेत लवकरच मी भेंडीचा दुसरा प्रकार शेअर करेल….. चला मग आपण आता टिफिन पण पॅक करून घेऊया…. तयार झालेल्या भेंडीच्या भाजीसोबत……

टिप्स :


भेंडीच्या भाजीवर झाकण ठेवू नये .भेंडी चिकट होऊ शकते. आणि भेंडीला सतत हलवू नये त्यामुळे भेंडी चिकट होते.


वेळ व परिमाण:


तयारीची वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ: ३० मिनिटे
परिमाण: २ जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4333

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.