चवळीच्या दाण्याची उसळ
प्रस्तावना::

उसळ हा प्रकार नाचण्यासाठी एकदमच छान किंवा आपण चपाती सोबत येतो खाऊ शकतो आणि लहान मुलांना उसळीचे प्रकार खूप आवडतात त्यामुळे आपण आता बघून घेणार आहोत चवळीची उसळ.
साहित्य::

- एक वाटी चवळी चे दाणे
- एक कांदा
- एक टोमॅटो
- पाच बारीक हिरव्या मिरच्या
- आठ लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अदरकाचा तुकडा
- पाव चमचा हळद
- अर्धा चमचा तिखट
- पाव चमचा गरम मसाला
- अर्धा चमचा धने पूड
- कोथिंबीर
- फोडणीसाठी तेल
- मीठ
- जिरे मोहरी
कृती::
सर्वप्रथम सोड्या सोलून घ्या. चोळीचे दाणे काढून घ्या. चवळीचे दाणे काढल्यानंतर ते एका पातेल्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुऊन घ्या .
आणि दहा ते पंधरा मिनिटे उकडून घ्या. या गाण्यांच्या ऐवजी तुम्ही तुमच्या घरात कोरडी चवडी असल्यास ती रात्री भिजत घालून सकाळी त्याचा वापर करू शकतात.
आता आपली चवळी उकळून झालेली आहे.कांदा बारीक चिरून घ्या. टोमॅटो बारीक चिरून घ्या. अद्रक आणि लसणाची बारीक अशी पेस्ट करून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करा. कढई मधील तेल कडकडीत गरम झाले की मग त्यामध्ये जिरे मोहरी तडतडून घ्या.
त्यानंतर त्यामध्ये मिरच्या अद्रक लसणाची पेस्ट घाला. चिरलेला कांदा घाला. टोमॅटो घाला आता हे मिश्रण चांगले परतवून घ्या.

चांगले परतले की त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा तिखट पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पूड घालून मिश्रण चांगले परतून घ्या.
ही चटणी चांगली परतल्यानंतर त्यामध्ये उकळलेल्या चवळ्या घाला. त्यामध्ये थोडे पाणी घाला. आणण्यासाठी पाण्याची गरज लागेल.
चवळीच्या भाजीला चांगले मिक्स करून घ्या. त्यावर झाकण ठेवा. दोन ते तीन मिनिटे चांगली वाफ येऊ द्या. अधून मधून हे मिश्रण ढवळा.
यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घाला. मीठ घातल्यानंतर दोन ते तीन मिनिटे चांगले झाकण ठेवून पुन्हा शिजू द्या.
आता आपले चवळीची उसळ चांगली शिजलेली आहे त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला.. आता आपली चवळीची उसळ तयार झालेली आहे .

ती तुम्ही चपाती सोबत पोळी सोबत खाऊ शकतात… किंवा आपल्याला नुसती उसळ खायची असली तशी पण तुम्ही वरतून बारीक शेव घेऊन खाऊ शकतात…….
उसळ करताना तुम्हाला चवळी ही तुम्ही डायरेक्ट कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये घालून त्यामध्ये जास्त पाणी घालून दहा ते पंधरा मिनिटे झाकण ठेवून शिजू देऊ शकतात. अशा प्रकारे तुम्ही न शिजवताना उसळ करू शकतात…..
आता आपली चवळीची उसळ तयार झालेली आहे हे उचल लहान मुलांना अत्यंत आवडते. त्यावर तुम्ही बारीक शेव घालून थोडी बुंदी घालून सुद्धा खायला देऊ शकतात सकाळच्या नाश्त्याला तर झक्कास मेनू आहे……

टिप्स::
चवळी शिजवताना तुम्ही कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन सुद्धा चवळी चे दाणे शिजवून घेऊ शकतात आणि त्यानंतर त्याला फोडणी घालू शकतात. पण मी ते पातेल्यामध्ये शिजवलेले आहे.
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ :१५मिनिटे
एकूण वेळ :२५मिनिटे
परिमाण :दोन व्यक्तींसाठी
