छोले पुरी भाजी
प्रस्तावना::
छोले पुरी हा सर्वात आवडता पदार्थ आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत हा पदार्थ आवडतो.
साहित्य::

- १वाटी छोले,
- १ मोठा बटाटा
- १कांदा,
- १टोमॅटो,
- १५ते २० लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अद्रक तुकडा,
- कडिपत्ता,
- पाव चमचा हळद,
- १ चमचा तिखट,
- १ चमचा छोले मसाला,
- जिरे मोहरी,
- फोडणी साठी तेल
- मीठ
- पाणी
छोले भाजी कृती::
छोले रात्री भिजत घालून ठेवावे.सकाळी धुऊन कुकरमध्ये छोले आणि बटाटे आठ शिट्ट्या घेऊन उघडून घ्यावी.

. कांदा बारीक चिरून घ्यावा. लसूण पाकळ्या अद्रक चा तुकडा आणि टोमॅटो कापून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यावी.
बटाटा साल काढून स्मॅश करून घ्यावा.एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी फोडणी घालावी.
त्यामध्ये चिरलेला कांदा तांबूस रंगावर परतवा. नंतर लसूण अद्रक टोमॅटो पेस्ट परतावा.
हळद, तिखट,छोले मसाला,बटाटा परतवा.नंतर त्यात छोले पाण्यासकट घाला.रस्सा साठी पाणी घाला.चवीप्रमाणे मीठ घाला.
जास्त पातळ नको. छोले भाजी तयार आहे.

पुरीचे साहित्य:
- १ वाटी कणिक,
- मीठ,
- पाणी
- तळण्यासाठी तेल
पुरीची कृती::

कणिक मध्ये मीठ घाला. पाणी घालून कडक कणिक मळा.आता गोल गोळे करा.पुरी लाटून घ्या.(पुरी मोठी करू शकतात.)कढईत तेल गरम करून घ्या.पुरी तळून घ्या.
गरम छोले पुरी तयार आहे.
टिप्स::
छोले उकळताना ८ शिट्ट्या किमान होऊ द्या .त्यामुळे ते नरम होईल.नाहीतर चिमटीभर सोडा घालू शकतात.
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ ३० मिनिटे
एकूण वेळ: १ तास
परिमाण :४ जणांसाठी
