दाळ गंडोरी

by Vaishali Chaudhari

दाळ गंडोरी(दाळ मिरची)

थोडक्यात

ही खांदेशी भागातील हिरवी पातळ भाजीचा प्रकार आहे

साहित्य

  • अर्धी वाटी तुरीची दाळ
  • 1 जाड हिरवी मिरची
  • 6 बारीक हिरवी लहान मिरची
  • अर्धी लहान वाटी शेगदाणे
  • 10 लसूण पाकळ्या
  • छोटा अद्रक तुकडा
  • हळद
  • पाव चमचा गरम मसाला
  • मीठ
  • फोडण्यासाठी तेल
  • जिरे, मोहरी
  • कोथीबिर

कृती

सर्वप्रथम आपण तुरीची डाळ स्वच्छ धुऊन घ्या. तुरीची डाळ स्वच्छ धुतल्यानंतर ती कुकरच्या पॅनमध्ये घाला. आणि त्यामध्ये कापलेली जाड मिरची घाला आता यामध्ये पाणी घालून दोन ते तीन शिट्या येऊ द्या. शिट्या झाल्यानंतर कुकर बंद करा.

चटणीची कृती::
तव्यावर आपण बारीक हिरव्या मिरच्या चांगल्या दोघांनी खरपूस भाजून घेऊ . त्यानंतर त्यावर शेंगदाणे खरपूस भाजून घेऊ.

शेंगदाणे आणि मिरच्या भाजल्यानंतर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला त्यामध्ये दहा लसूण पाकळ्या घाला अद्रकाचा तुकडा घाला कोथिंबीर घाला .

अर्धा चमचा धने पूड पाव चमचा जिरे घाला. याची बारीक चटणी करून घ्या. चटणी मध्ये तुम्ही पाणी घाला त्यामुळे चटणीची पेस्ट तयार होईल. आपली हिरवी चटणी आता तयार झालेली आहे.

आपण भाजीला फोडणी देऊ. एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा त्यामध्ये जिरे, मोहरी, लसूण चे काप घाला. तडतडल्यानंतर त्यामध्ये आपली हिरवी चटणी घाला .

हिरवी चटणी घातल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद ,पाव चमचा गरम मसाला चटणी चांगली तेल सुटेपर्यंत परतवून घ्या. चटणीला आजूबाजूने तेल सुटलेले आहे.

आता आपले कुकरचे झाकण उघडून घ्या आणि त्यामधील डाळ आणि डाळ मिरचीचे मिश्रण तेल सुटलेल्या चटणीच्या मिश्रणामध्ये घाला.

आता हे मिश्रण मिक्स करून घ्या. त्यानंतर गरम पाणी करून घ्या त्यामध्ये आपण गरम पाणी घाला आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी म्हणजेच ती पातळ कशी हवी.

त्या पद्धतीने तुम्ही पाणी घाला. भाजीला उकड्या आल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला. चवीप्रमाणे मीठ घातल्यानंतर त्याला चार ते पाच उकळ्या येऊ द्या.

त्यावर झाकण ठेवा. आता आपली डाळ गंडोरी किंवा मिरचीची भाजी तयार झालेली आहे…. तुम्ही पोळी सोबत ज्वारीच्या भाकरी सोबत खाऊ शकतात..

या भाजीला डाळ गंडोरी यासाठी म्हणतात की त्यामध्ये मिरचीच्या गोल काप म्हणजेच गंडोऱ्या केलेल्या असतात म्हणून या भाजीला डाळ गंडोरी असे म्हणतात….

चला तर मग आपली हिरवी भाजी तयार झालेली आहे……

टिप्स

या भाजीमध्ये तुरीच्या डाळीचा वापर केलेला आहे या ऐवजी तुम्ही मुगाच्या डाळीचा सुद्धा वापर करू शकतात. मुगाच्या डाळीमुळे ऍसिडिटी होत नाही… पण मात्र तुरीच्या डाळीची चव उत्तम लागते..भाजीला तेल सुटण्यासाठी अर्धे झाकण ठेवावे, कारण पूर्ण झाकण ठेवल्याने तेल भाजीत मुरून जाते

वेळ व परिमाण

तयारीची वेळ 10 मिनिटे

एकूण वेळ 40 मिनिटे

परिमाण 5 झण

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.