दोडक्याची कोरडी भाजी

by Vaishali Chaudhari

दोडक्याची कोरडी भाजी.


प्रस्तावना:


दोडक्याची भाजी ही पारंपारिक भाजी असून ही सर्वांना आवडणारी भजी आहे दोडक्याची चटणी सुद्धा केली जाते आणि यामध्ये लोह मॅग्नेशियम पोटॅशियम फायबर्स ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.


साहित्य:

  • पाव किलो दोडके
  • पाच हिरव्या मिरच्या
  • दहा ते बारा लसूण पाकळ्या
  • अर्धी वाटी शेंगदाणे,
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा तिखट
  • पाव गरम मसाला
  • जिरे
  • फोडणीसाठी तेल
  • मीठ


कृती::

सर्वप्रथम दोडके स्वच्छ धुऊन घ्या आणि दोडक्यांवरच्या शिरा काढून घ्या त्यात सोलून घ्या आणि मग दोडके चिरून घ्या .

दोडके च्या शिरा काढण्या आवश्यक आहे त्याचे सालही काढावेच लागते त्यानंतर मग ते कापावे. हिरव्या मिरचीचे काप करून घ्या.

तसेच लसूण पाकळी सोलून त्याचे काप करून घ्या. तव्यावर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्या आणि त्याचे कूट करून घ्या.

आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे घाला लसणाची काप घाला आणि परतवून घ्या.

त्यानंतर मिरची घालून परतून घ्या. मिरचीचे काप घातल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा तिखट घाला आणि गरम मसाला घाला.

ही सर्व साहित्य घातल्यानंतर चांगले परतून घ्या. मसाला परतवल्यानंतर त्यामध्ये कापलेले दोडक्याचे काप घाला.

आता भाजी पुन्हा परतून घ्या चांगली सात-आठ मिनिटे झाकण ठेवून भाजी वाफवून घ्या. झाकण ठेवल्यामुळे भाजी चांगली वाफली जाते आणि ती नरम होते.

भाजी चांगली वाफल्यानंतर त्यामध्ये आपण दाण्याची कूट घालूया दाण्याची कूट घालून भाजी चांगली परतवून घ्या .

आणि आपल्या चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घाला. यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला आणि एक वाफ येऊ द्या. भाजी चांगली व्यवस्थित नरम झाली की मग गॅस बंद करा.

आता आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे….

दोडक्याची भाजी तुम्ही चपाती ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी या सोबत तुम्ही खाऊ शकतात.


टिप्स::

दोडक्याच्या शिरा जर आपण काढल्या नाहीत तर दोडके लवकर शिजत नाहीत…

वेळ व परिमाण::


तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ :३०मिनिटे
परिमाण :१व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.