फौजदारी डाळ आणि उडदाची डाळ

by Vaishali Chaudhari
10 views

फौजदारी डाळ आणि उडदाची डाळ


प्रस्तावना::

उडदाची डाळ किंवा फौजदारी डाळ ही खानदेश भागातील एकदम स्पेशल भाजी आहे… आमच्या आजीच्या काळापासून या भाजीच्या मोठ्या मोठ्या पार्ट्या व्हायच्या…. पावसाळी दाळ म्हटले म्हणजेच सगळ्यांच्या तोंडाला पाणी….. या भाजी सोबत बाजरीची भाकरी तर आहाहा खूपच छान लागते…. ही भाजी सूप प्रमाणे खाण्यास (पिण्यासही) एकदम छान लागते….. आमची आजी पूर्वी पाट्यावर मसाला वाटून फौजदारी डाळ बनवायची….. यामध्ये मी एक वेगळी पद्धत सांगितली आहे कांदा ज्याप्रमाणे आपण गॅसवर भाजला आहे पूर्वीच्या काळी चुल्यामध्ये घालून कांदा भाजला जायचा त्याची एक वेगळी चव भाजीला यायची..…. आणि भाजीचा रंगही एकदम छान भाजी बघताक्षणी आपल्याला ती खावीशी वाटणार….. आणि चव तर एकदमच उत्तम लागते….

साहित्य:

एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ दोन कांदे पंधरा ते वीस काप होतील इतके खोबऱ्याचा तुकडा पंधरा लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रकाचा तुकडा चार लाल मिरच्या पाच लवंग पाच मिरे छोटासा दालचिनीचा तुकडा कोथिंबीर पाव चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा धनापूर पाव चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आणि फोडणीसाठी तेल आणि गरम पाणी

कृती:::

सर्वप्रथम उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुऊन घ्या कुकरमध्ये घाला त्यामध्ये पाणी घाला आणि चार ते पाच शिट्या होतील आणि डाळ नरम होईल इतपत ते शिजवून घ्या….. त्यानंतर आपण मसाल्याची तयारी करून घेऊ…
मसाल्याची कृती:::
मसाला तयार करताना मी इथे एक वेगळीच पद्धत वापरलेली आहे इथे आपण कांदा आणि खोबरं डायरेक्ट गॅसवर भाजणार आहे ते काही चिरून वगैरे न भासता अख्खा खांदा आणि अख्खी खोबरं डायरेक्ट गॅसवर भाजून घेऊ…. त्यानंतर त्याचा तुकडे करून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि खोबऱ्याचे सुद्धा काप करून घ्या ते घाला आणि अद्रकाचा तुकडा लवंग मिरे, लाल मिरच्या लाल मिरच्या सुद्धा आपल्याला गॅसवर भाजायच्या आहे मात्र त्या अगदीच थोड्या भाजायच्या आहेत त्या जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे मिरच्या लालच राहिला हव्या… मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घातल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी घालून त्याचे बारीक असे वाटण करून घ्या. आपली चटणी तयार झालेली आहे …

कृती::::

आपली चटणी आता तयार झालेली आहे आता कढईमध्ये तेल घालून चटणीला फोडणी देऊन घेऊ कढईमध्ये तेल गरम करा आपले तेल चांगले कडकडीत गरम झाले… की त्यामध्ये जिरे मोहरी घाला त्यानंतर चटणी घाला… चटणी मध्ये पाव चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा धनापूर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून चटणी चांगली तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्या… चटणीला आजूबाजूला छान तेल सुटते चटणीला चांगले तेल सुटले की मग…. उडदाचे डाळ चे मिश्रण त्यामध्ये घाला आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या…. यानंतर आपण एक ते दीड ग्लास गरम पाणी करून घ्या. आता मी इथे एक ग्लास पाण्याचा वापर करणार आहे आपल्याला भाजीमध्ये एक ग्लास पाणी घालायचे आहे….. आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी किती पातळ हवी त्या पद्धतीने आपण पाणी घालावे…. इथे मी एक ग्लास पाण्याचा वापर केला आहे तुम्हाला जर भाजी अजून पातळ हवी असल्यास तुम्ही दीड ग्लास पाण्याचा वापर सुद्धा करू शकतात…. आता भाजीवर झाकण ठेवून चांगल्या दोन ते तीन उकळ्या येऊ द्या…. जिला उकळ्या आल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला…. चवीप्रमाणे मीठ घातल्यानंतर पुन्हा दोन ते तीन उकळ्या येऊ द्या यावर आपण अर्धवट झाकण ठेवलेले आहे त्यामुळे आपल्या भाजीला तवंग सुटतो….. मी माझ्या प्रत्येक रेसिपी मध्ये सांगितलेली आहे. …. भाजीला उकड्या आल्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला आता आपली फौजदारी डाळ तयार झालेली आहे याला फौजदारी डाळ किंवा उडदाची डाळ असेही म्हणतात ही डाळ तुम्ही ज्वारीची भाकर चपाती किंवा बाजरीची भाकर सोबत खाऊ शकतात….. चला तर मग एन्जॉय करूया गरमागरम खानदेश स्पेशल मसालेदार फौजदारी डाळ किंवा उडदाची डाळ…..
भाजीची चटणी बनवताना आपल्याला कांदा भाजूनच घ्यायचा आहे आणि संपूर्ण कांदा त्या चटणी मध्ये घालायचा आहे त्यावरचे वरचे साल वेगळे करायचे नाही कारण त्या सालीसकट आपल्याला कांदा घालायचा आहे वाटल्यास तुम्ही कांदा सुरुवातीला धून भाजू शकतात….

वेळ व परिमाण::::


तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ:३० मिनिटे
परिमाण चार व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

6943

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.