🥘 १. रेसिपीचं नाव
“फौजदारी उडदाची डाळ
📸 २. फोटो / फीचर्ड इमेज : रेसिपीचा एक सुंदर, नैसर्गिक फोटो —

✨ ३. प्रस्तावना
हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,फौजदारी म्हटलं की झणझणीत असं बेत आपल्यासमोर येतो मसालेदार अशी उडदाची डाळ अत्यंत रुचकर अशी.
📝 ४. साहित्य (Ingredients)

अर्धा कप काळी उळदाची डाळ,
२ टेबलस्पून हरबरा डाळ,
१ कांदा बारीक चिरूम,
१५-२० खोब्रा काप,
१ टेबलस्पून धणे,
१ टेबलस्पून गरम मसाला,
२ टेबलस्पून तिखट ,
खट,
सात लसूण पाकळ्या,
अर्था उंच आल्याचा तुकडा,
पाणी,
मीठ चवीप्रमाण
तेल,
कोथींबीर,
🔥 ५. कृती (Steps)
सर्वप्रथम काठी उळीद डाळ , हरखरा डाळ धूवून घ्या. नंतर कुकरमध्ये दोन्ही डाळी एकत्र पाच शिट्टी होईपर्यंत उकळून घ्या.
तवा गरम झाला की त्यावर बारीक चिरलेला कांदा तांबूस रंगावर भाजून घ्या नंतर खोबऱ्याचे कापही तांबूस रंगावर भाजून घ्या गॅस बंद करा. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले कांदा भाजलेले खोबरे धणे, तिखट, लसूण अद्रक या सर्वांची पाणी घालून बारीक अशी चटणी करून घ्या. चटणी बारीक झाली की नाही याची खात्री करून घ्या.
उकडलेली उडदाची व हरभऱ्याच्या डाळीमध्ये रवीने थोडे घोटून घ्या. एका पातेल्यात गरम पाणी करून घ्या. एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल घाला. तेल कडकडीत गरम झाले की त्यामध्ये वाटलेली चटणी घाला. चटणीला सांगली परतवून घ्या. चटणीला हळूहळू तेल सुटेल तिकडे पासून वेगळी होऊन लागेल. त्यामध्ये उकडलेले उडदाचे डाळ व हरभऱ्याची डाळ चे मिश्रण घाला.
आता आपल्या गरजेप्रमाणे त्यामध्ये गरम पाणी घाला. या भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घाला भाजीला चांगल्या मंद आचेवर चार ते पाच उकळ्या येऊ द्या. भाजीमध्ये चिरलेली कोथिंबीर घाला
(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)
💡 ६. टिप्स (Cooking Tips)
इथे आपण काळी उडदाची डाळ म्हणजे सालीची(पोतरांची) डाळ वापरलेली आहे सालीची दाळ वापरावी बिना सालीचे दाळचे फौजदारी डाळ चांगली लागत नाही.
फौजदारी उडदाची डाळ ही गरमागरम पोळी सोबत तसेच बाजरीच्या भाकरी सोबत आपण खाऊ शकतो. त्यासोबत कांदा टोमॅटो खाऊ शकतो. “फौजदारी डाळ ही खानदेशामध्ये याच्या पार्ट्या केल्या जातात खानदेशामध्ये भरपूर प्रमाणावर खाल्ली जाते.
