🥘 १. रेसिपीचं नाव
“गिलकेची भरीत
📸 २. फोटो / फीचर्ड इमेज :रेसिपीचा एक सुंदर, नैसर्गिक फोटो

गिलके भरीत
✨ ३. प्रस्तावना
थोडक्यात त्या पदार्थाबद्दल माहिती — हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात, आणि खाण्यास
📝 ४. साहित्य (Ingredients
- दोन गिलके,
- 4 जाड मिरची
- बारीक मिरची
- लसूण पाकळ्या,
- तेल.
- शेंगदाणे,
- मीठ,
- कोथींबीर
🔥 ५. कृती (Steps)
- दोन गिलके धुवून घ्यावेत व त्याचे छोट्या छोट्या चकत्या करुन घ्यावे, त्यानंतर चकत्या कुकरमध्ये पाणी टाकून दोन शिट्ट्या होऊ दयावेत,(गिलके आपण कुकरमध्ये लावलेत पण काही वेळा पूर्वीचे लोक कुकरमध्ये गिलके लावलेले त्यांनी चव जाते असे म्हणायचे त्यामुळे आपण एका कढईमध्ये थोडे तेल घालून त्यामध्ये गिलक्याच्या चकत्या वाफवून घेऊ शकतो.कढाई मध्ये चकत्या वाफवताना त्या बाहेरील साल पूर्णपणे वाफली गेली आहे का हे बघून घ्यावे मगच गॅस बंद करावा.)
- नंतर तवा गरम करून त्यावर मिरच्या भाजून घ्याव्यात. तसेच शेंगदाणे ही भाजून घ्यावे. नंतर शेंगदाण्याचे साल काढून घ्यावे.(यामध्ये तुम्ही फक्त जाड मिरचीचाही वापर करू शकतात.)
- बडगीमध्ये मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे , कोथिंबीर चांगले ठेचून घ्यावेत.
- नंतर त्यात गिलके धालून व्यवास्यित “ठेचून घ्या. नंतर आपल्या चवीनुसार मीठ घाला
- पुन्हा एकत्र ठेचा
- कढाईत तेल गरम करून घालून जीरे मोहरी घालून हे गिलके मिश्रण चांगले परतवा.
- गिलक्याचे भरीत तयार आहे..गिलक्याच्या भरीतासोबत आपण गरमागरम कढी घेऊ शकतो. कोडे भाजी सोबत एखादा पातळ पदार्थ पिण्यास असल्यास भाजी पोळी सहजच खाल्ली जाते.
💡 ६. टिप्स (Cooking Tips)
(गिलके हा प्रकार बऱ्याच जणांना आवडत नाही त्यामुळे गिलक्याचे भरीत अत्यंत चवीला रुचकर लागते. नेहमीच्या भाजीपेक्षा ही भाजी वेगळी बनते तसेच ती आपण पोळी सोबत किंवा फुलक्या सोबत खाऊ शकतो.)
• गिलके घेताना छोटे छोटे घ्यावेत,
• थोडं शेंगदाणा कुट, पावडर घातल्याने चव वाढते.
🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)
भाकरी, चपाती सोबत उत्तम लागते.
🕒 ८. वेळ व परिमाण
• तयारीची वेळ: १० मिनिटे
• शिजवण्याची वेळ: १५ मिनिटे
• एकूण वेळ: २५ मिनिटे
• परिमाण: २ जणांसाठी
❤️ ९. निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी
हा पदार्थ आरोग्यदायी, झटपट आणि पारंपरिक चवीचा आहे.
