गुळाची गोड पोळी
प्रस्तावना::

गुळाची पोळी म्हटलं की गोड सर्वांना आवडतेच. तसेच आजीच्या काळातली स्पेशल रेसिपी. आणि बाहेरगावी जाताना दिली जाणारी दोन ते चार दिवस टिकणारी अशी ही गुळाची पोळी. तर बघूया आपण गुळाच्या पोळी ची रेसिपी…
कुठे ट्रीपला जायचं झालं तर बनवूया गरमागरम गुळाच्या पोळ्या… खूप दिवस टिकतीलही आणि मुलांना आवडतीलही….
साहित्य::

- १ वाटी गूळ
- ३ वाटी कणीक
- १ वाटी पाणी
- चिमूटभर मीठ
- अर्धी वाटी दूध
कृती::
एका पातेल्यामध्ये एक वाटी गरम पाणी करा त्यामध्ये एक वाटी गूळ घालून गुळाचे पाणी चांगले उकळवून घ्या.
गुळ त्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला हवा. हे गुळाचे पाणी चाळणीच्या साह्याने गाळून घ्या. परातीमध्ये तीन वाट्या कणिक घ्या .
त्यामध्ये चिमूटभर मीठ घाला. पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता कणिकमध्ये आपण केलेले गुळाचे पाणी दूध घालून कणिक मळून घ्या .

कणिक मळण्यासाठी गरजेप्रमाणे तुम्ही एक्स्ट्रा पाणी वापरू शकतात कणिक ही पोळ्यांप्रमाणे मऊसूत असावी.
मऊसूद कणिक च्या पोळ्या या नरम येतात. दहा ते पंधरा मिनिटं कणिक चांगली मुरून घेऊ द्या.आता ज्याप्रमाणे आपण पोळ्या करतो.
त्याप्रमाणे गोळा करून पोळी लाटून घ्या. तवा गरम करून घ्या त्यावर लाटलेली पोळी शिकून घ्या त्या पोळीला दोघ बाजूने सराट्याच्या साह्याने तेल लावून घ्या.

किंवा तुम्ही सुद्धा त्याला लावू शकतात. हे गुळाची पोळी तुम्ही कोरड्या चटणी सोबत तेल घेऊन खाऊ शकतात.
आपण कुठे प्रवासाला जाणार असेल तर त्यावर ठेचाही घेऊन खाऊ शकतो. या पोळ्या तीन ते चार दिवस सहजच राहतात त्या खराब होत नाहीत.
किंवा त्याला बुरशी येत नाही. त्यामुळे या प्रवासासाठी तुम्ही बनवून घेऊ शकतात.

टिप्स:
कणिक मळताना जे गुळाचे पाणी आपण वापरतो ते गरम गरमच वापरावे जेणेकरून आपण ज्या पोळ्या करून त्या मऊ राहतील कणीक भिजवताना इथे मी पाणी वापरले आहे तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकतात.
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ:३० मिनिटे
परिमाण: ४ व्यक्तीसाठी
