हॉटेल स्टाईल मिक्स व्हेज

by Vaishali Chaudhari

हॉटेल स्टाईल मिक्स व्हेज.


प्रस्तावना::

हॉटेलच्या भाज्या इयत्ता प्रत्येकालाच आवडतात. त्याची बनवण्याची पद्धत ही वेगळीच असते. त्यांचे वापरलेले मसाले असतात त्यांची जी चटणी असते ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेली असतात. त्यामुळे भाजीच्या चवीमध्ये फरक पडतो चला तर बघूया आज मग मिक्स व्हेज.

साहित्य:

  • दोन मोठे बटाटे,
  • 200 ग्रॅम फ्लावर,
  • दोन मोठ्या सिमला मिरच्या,
  • शंभर ग्रॅम हिरवा गार सोललेला वाटाणा,
  • कोथिंबीर,
  • 100 ग्रॅम पनीर ,
  • अर्धी वाटी घट्ट दही,
  • पाणी

भाजीला लागणाऱ्या मसाल्याचे साहित्य:

  • दोन मोठे कांदे,
  • तीन टमाटे,
  • १० लसूण पाकळ्या,
  • अर्धा इंच अद्रकचा तुकडा,
  • पाच लवंग,
  • पाच मिरे,
  • एक दालचिनीचा तुकडा,
  • तीन हिरवे वेलची,
  • एक मोठी मसाला वेलची,
  • एक तेजपान,
  • एक स्टारफुल,
  • एक बाजा,
  • पाव चमचा हळद
  • दोन चमचे तिखट,
  • दोन चिमटी कसुरी मेथी,
  • मीठ फोडणीसाठी
  • तेल

(इथे मी काही साहित्य फोटोमध्ये दाखवले गेले नाही तरी मी ते कृतीमध्ये लिहिलेले आहे त्याप्रमाणे घालावे.)

चटणीची कृती::

सर्वप्रथम कांदा बारीक चिरून घ्यावा. टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.

आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा लसणाच्या पाकळ्या, अद्रकाचा तुकडा आणि चिरलेला कांदा याची पाणी घालून पेस्ट करून घ्यावी.

ती एका वाटीमध्ये काढून घ्यावी. आता आपण जी खडे मसाले काढलेले आहेत ते गरम तव्यावर मंद आचेवर शेकून घ्यावेत. पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शिकलेले मसाले चांगले बारीक वाटून घ्यावे.

त्याची बारीक पूड करावी. ही पूड एका वाटीमध्ये काढून घ्यावी. त्यानंतर पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. हे मिश्रण दुसऱ्या वाटीमध्ये काढावे.


भाजी बनवण्याची कृती:

सर्वप्रथम आपण सर्व भाज्या धुवून घ्याव्यात. भाज्या धुतल्यानंतर बटाट्याची काप करून घ्यावे फ्लॉवर चे काप करून घ्यावी.

सिमला मिरचीचे ही चौकोनी काप करून घ्यावे.एका मोठ्या पातेल्यामध्ये गरम पाणी करून त्यामध्ये हिरवा वाटाणा कापलेला बटाटा फ्लावर सिमला मिरची या सर्व भाज्या चांगल्या चार ते पाच मंद आचेवर उकड्या येऊन उकडून घ्याव्यात.

यांना उकडण्यासाठी साधारण दहा मिनिटे लागतील.आता गॅस बंद करावा.

पनीरचे तुकडे करून एका छोट्या कढईमध्ये थोडे तेल घालून त्यामध्ये मीठ घालावे आणि थोडे पनीर परतवून घ्यावे.

एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांद्याची चटणी परतवावी. कांद्याची चटणी चांगली परतत आली की त्यामध्ये आपण केलेली खडा मसाल्याची पूड घालावी.

आता टोमॅटोची चटणी केली आहे ती पण आपण परतवून घ्यावी. त्यामध्ये पाव चमचा हळद घालावी दोन चमचे तिखट घालावे. ही चटणी चांगली व्यवस्थित परतून घ्यावी.

चटणीला व्यवस्थित रित्या तेल सुटले की मग आपण उकडलेल्या सर्व मिक्स भाज्या त्यामध्ये घालाव्यात.

आता फ्राय केलेले पनीर चे तुकडे ही त्यात घालावेत. दही चांगले फेटून घ्यावे. भेटल्यानंतर ते भाजीमध्ये घालावे व हळुवार भाजी परतवून घ्यावी.

भाज्या या पाण्यासहित घालाव्या कारण आपण भाज्या ची चव पाण्यामध्ये उतरलेली असते. चांगली भाजी परतवून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालावे.

भाजीला चांगल्या उघड्या येऊ द्याव्यात. भाजी मंद आचेवर शिजू द्यावी. त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालावी.

भाजी चांगली दहा मिनिटे उकळ्या आल्यानंतर त्यावर झाकण ठेवून गॅस बंद करावा. त्यामध्ये हातावर चिमूटभर कसुरी मेथी घेऊन ती चांगली चोळून त्यावर भाजीमध्ये घालावी आणि ढवळून पुन्हा झाकण ठेवावे.

(त्यामध्ये शेवटी तुम्ही बटर सुद्धा घालू शकतात ही ऑप्शनल आहे)आपली मिक्स व्हेज तयार आहे.

मिक्स व्हेज हे चपाती सोबत किंवा नान किंवा तंदुरी रोटी सोबत तुम्ही खाऊ शकतात. नान आणि तंदुरी रोटी कसे बनवतात हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे.

कसुरी मेथी मुळे भाजीला एक वेगळा सुगंध येतो. ही कसुरी मेथी तुम्ही घरी केलेली सुद्धा घालू शकतात.

टिप्स::

आपण ज्या मिक्स वेज साठी भाज्या वापरल्यात त्या ऐवजी तुम्हाला अजून काही भाज्या त्यामध्ये घालायच्या असल्या तर तुम्ही घालू शकतात. आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये शेंगांचे थोडे वेगवेगळे प्रकारही घालू शकतो. शिवाय तुम्ही पनीरचा वापर नाही केला तरी चालू शकतो पण पनीर घातल्यानंतर भाजी अत्यंत चवदार लागते आणि ती मुलांनाही आवडते.

वेळ व परि माण::
तयारीची वेळ: ४० मिनिटे
एकूण वेळ:१तास ३० मिनिटे
परिमाण: ६ जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.