प्रस्तावना::: खिशी चे प्रकार बऱ्याच प्रकारे मध्ये मोडतात.. जशी की नागलीची खिशी, तांदळाची खिशी ,ज्वारीची खिशी…
साहित्य:: एक मोठी वाटी खिशीचे पीठ दोन वाट्या पाणी तेल एक वाटी तीळ चवीप्रमाणे मीठ
कृती:: एका कढईमध्ये दोन वाट्या कडकडीत पाणी गरम करा.. पाण्याला छान उकळी आल्या की मग गॅसची आच बंद करा… त्यामध्ये ज्वारीचे खिशीचे पीठ घाला.. आणि लाटण्याच्या किंवा रवीच्या साह्याने त्यामध्ये हळूहळू मोडून घ्या. म्हणजेच घोटून घ्या., पीठ पाण्यामध्ये मोडले जाईल… आणि ज्याप्रमाणे कणकेचा गोळा तयार होतो त्याप्रमाणे गोळा तयार होईल…. जर गोळा कडक वाटत असल्यास तुम्ही अजून अर्धी वाटी किंवा एक वाटी गरम पाणी घाला.. ही मऊ अशी लुसलुशीतच हवी… पुन्हा अर्धी वाटी पाणी त्यात मोडल्यानंतर त्यावर एक झाकण ठेवा आणि मंद आचेवर दोन ते तीन वाफ येऊ द्या.. आता गॅसची आच बंद करा
.. आता आपली खिशी तयार झालेली आहे ती एका ताटामध्ये काढा…. खिशी ताटामध्ये घातल्यानंतर त्यावर तेल घाला… आणि सराट्याच्या साहाय्याने त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या आणि त्यावर तीळ घाला…. आता आपली गरमागरम लुसलुशीत खिशी तयार झाली आहे… चला आता मग खिशी आपण एन्जॉय करूया….
टिप्स::: कशी तयार करताना पाणी हे पिठाच्या दुप्पट असते पण ती खाताना घशात अडकू नये म्हणून आपण एक वाटी पाण्याचा जास्त वापर केलेला आहे जेणेकरून खिशी मऊ लुसलुशीत होईल आपल्याला पापड करायचे असतील त्यावेळेस एक वाटी पिठा साठी दोन वाट्या पाणी इतकाच वापर करावा…. आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून मग तुम्ही पापड लाटू शकतात…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ :५ मिनिटे
एकूण वेळ :२० मिनिटे
परिमाण: दोन व्यक्तींसाठी
© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.
