🥘 १. रेसिपीचं नाव
ताकाची कढी
📸 २. फोटो / फीचर्ड इमेज : रेसिपीचा एक सुंदर, नैसर्गिक फोटो —

✨ ३. प्रस्तावना
हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात, खास मेजवानित याचा समावेश आहे
📝 ४. साहित्य (Ingredients)
- १ ताकाची पिशवी (अर्था लीटर)
- ५ लसूण पाकळी,
- अर्धा इंच आल्याचा तुकडा,
- १ मिरची, दगडफूल,
- जीरे मोहरी,
- १ चम्चा तूप,
- १ छोटी वाटी चमचा बेसन,
- १ चमचा ज्वारीचे पीठ,
- मीठ,
- कोथींबीर,
- ३ कढीपत्ता पाने

🔥 ५. कृती (Steps)
आल(अद्रक) -लसुणाची पेस्ट करून घ्यावी.आपल्याजवळ दही असल्यास दह्यामध्ये पाणी घालून त्याचे ताक करून तयार करून घ्यावे.
एका पातेल्यात ताकात आले-लसूण पेस्ट, बेसन ज्वारीचे पीठ व्यवस्थित mix करून घ्या,(किंवा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या अद्रक बेसन ज्वारीचे पीठ याचे मिश्रण पाणी घालून तयार करू शकतात हे ताकामध्ये मिक्स करण्यात अत्यंत सोपे जाते.)
नंतर एका कढाईत तूप घालून जीरे मोहरी तडका द्यावा.
त्यात १ मिरची तुडे, दगडफुल, कढीपत्ता घाला परतवा.
नंतर ताकाचे मिश्रण घाला .ताक मिश्रणामध्ये घातल्यानंतर हळूहळू सतत परतवत राहा. ही कडी मंद आचेवर परतवत राहा यामुळे कढी फुटत नाही.
(किंवा आपण ही कडी फुल गॅसवर करू शकतो कारण फुल गॅसवर केलेली कढी उतू येत नाही किंवा ती फुटत नाही. अशा वेळेस कडी ढळवी लागत नाही.)त्यात चवीप्रमाणे मीठ घाला.
ताकाला दोन उकळ्या आल्या की गॅस बंद करा.
कढीत चिरलेली कोथींबीर घाला.
कढी तयार आहे .
(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)
💡 ६. टिप्स (Cooking Tips)
कढी ही पिण्यास सर्वांना आवडते तसेच आपण कढीही पुरी सोबत भाकरी सोबतही खाऊ शकतो.
🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)
भाकरी, चपाती किंवा भातासोबत उत्तम लागते.

