मेथीची पोळी किंवा पराठा

by Vaishali Chaudhari
0 views

मेथीची पोळी किंवा पराठा


प्रस्तावना::

मेथीची पोळी ही हिवाळ्यामध्ये खाल्ली जाते.. किंवा उन्हाळ्यातही ही बऱ्याचदा केल जाणार पदार्थ आहे…. यामध्ये काय भाजी असतात हा मोठा प्रश्न पडतो त्यामुळे झटपट अशी तयार होणारे मेथीच्या पोळी आणि निस्त्याची चटणी हा बेत सगळ्यांनाच आवडतो आणि त्यासोबत फोडलेला असा कांदा….. जेवण एकदम परफेक्ट बनते…. त्याची चटणी म्हणजे गोड आंबट चटणी जी तोंडाला एकदम चव आणून टाकते….


साहित्य::

  • एक चमचा मेथीचे पीठ
  • चार पोळ्या होतील इतके गव्हाचे पीठ
  • तीन पोळ्या होतील एवढे ज्वारीचे पीठ
  • पाव चमचा हळद
  • मीठ चवीप्रमाणे
  • आणि पाणी


कृती:::

एका परातीमध्ये मेथीचे पीठ त्यावर हळद घाला आणि चवीप्रमाणे मीठ घाला.. ज्याप्रमाणे तुम्ही सात पराठ्यांसाठी मीठ घालतात त्याचप्रमाणे सात पराठ्यांसाठी तुम्ही इथे चवीप्रमाणे मीठ घाला…

आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्या…. आणि हे मिश्रण चांगले दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित फेटून घ्या…

मिश्रण पेटल्यानंतर त्यामध्ये मेथीचे पीठ आणि हळद मीठ हे तिन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स होतील…

आता त्यामध्ये ज्वारीचे पीठ आणि गव्हाचे पीठ म्हणजेचकणिक व्यवस्थित भिजवून गोळा तयार करून घ्या…

ज्याप्रमाणे आपण पोळ्या करण्यासाठी कणिकचा गोळा मळतो त्याचप्रमाणे हा ही गोळा मळून घ्यायचा आहे….

जास्त नरम पण नाही आणि जास्त कडक पण नाही…. गोळ्याला थोडे तेल घालून व्यवस्थित मळून घ्या… सात आठ गोळे करून घ्या……

त्यानंतर आपण ज्याप्रमाणे पोळी लाटतो त्याप्रमाणे पोळीपाटावर पोळी लाटून घ्या… आणि तवा गरम करून ही पोळी दोन्ही बाजूंनी चांगली खरपूस भाजून घ्या त्या पोळीला संपूर्ण तेल लावा….

पोळी चांगली खरपूस भाजल्यानंतर आपली मेथीची पोळी किंवा पराठा आता तयार झालेली आहे…. ही पोळी तुम्ही प्रवासाला सुद्धा नेऊ शकतात ही पोळी साधारण दोन दिवस टिकते….

या मेथीच्या पोळी सोबत छान निस्त्याची लाल चटणी आपण खाऊ शकतो किंवा शेंगदाण्याची चटणी सुद्धा खाऊ शकतो…..

तर आपली तयार झालेला आहे मेथीच्या पराठा किंवा मेथीची पोळी…..


टिप्स:::

मी तिचा पराठा किंवा पोळी तयार करत असताना मेथीचे पीठ हे सुरुवातीलाच मि ज्याप्रमाणे दाखवले आहे त्याप्रमाणेच भिजवून घ्यावे म्हणजे ते सर्व बाजूला व्यवस्थित मिक्स होते…. आणि आपण ज्या वेळेस गोळा तयार करतो त्यालाच चांगला पिवळसर रंग येतो आणि सगळ्या बाजूला मी तिचे पीठ व्यवस्थित एकत्र होते…


वेळ व परिमाण:::


तयारीची वेळ :५मिनिटे
एकूण वेळ:२० मिनिटे
परिमाण:तीन व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7037

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.