मिक्स दाल तडका
प्रस्तावना:

दाल तडका अत्यंत पौष्टिक व प्रोटीन युक्त आहे यामध्ये मिक्स डाळी वापरल्यामुळे त्याची पौष्टिकता अधिकच वाढलेली आहे. मुले अशी डाळ किंवा वरण खात नाहीत. हेच जर तुम्ही वेगळ्या स्वरूपात दिले तर मुलांना आवड निर्माण होते.
साहित्य:
- अर्धी वाटी तूर डाळ,
- अर्धी वाटी मूग डाळ,
- दोन चमचे हरभरा डाळ,
- एक कांदा एक टोमॅटो,
- सात ते आठ लसूण पाकळ्या,
- अर्धा इंच अद्रकाचा तुकडा,
- दोन लाल रसगुल्ला मिरच्या,
- पाव चमचा हळद,
- कोथिंबीर,
- कढीपत्त्याची दोन पाने,
- आणि हिंग,
- पाव चमचा लाल तिखट,
- पाव चमचा गरम मसाला,
- चिमुटभर कसुरी मेथी
- पाणी,
- फोडणीसाठी तेल,
- जिरे मोहरी,
- मीठ

कृती::
सर्वप्रथम मुगाची डाळ तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ मिक्स करून घ्याव्यात.
सर्व डाळी एकत्र करून स्वच्छ धुऊन घ्याव्यात. ज्याप्रमाणे आपण वरण वाफवून घेतो.
त्याप्रमाणे या तिन्ही डाळी चे वरण वाफवून घ्यावे कुकरला तीन ते चार शिट्ट्या होऊ द्याव्यात.
एक कांदा चिरून घ्यावा एक टोमॅटो चिरून घ्यावा. अद्रक लसणाची पेस्ट करून घ्यावी. आता आपण एका कढईमध्ये कडकडीत गरम तेल करावे .
गॅस मंद करून त्यामध्ये जिरे मोहरी फोडून कढीपत्त्याची पाने घाला .त्यामध्ये कांदा टोमॅटो तांबूस रंगावर परतून घ्या.
त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालून चांगले परतवून घ्या. पाव चमचा हळद घालून तिखट गरम मसाला घाला.
मिश्रण चांगले परतवून घ्या. वरण चांगले रवीच्या साह्याने लोणून घ्या. लोणलेले वरण परतवलेल्या मसाल्यामध्ये घाला त्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घाला.
हा दाल तडका जरा घट्टच असतो. त्यामुळे पाणी अर्धी वाटी किंवा एक वाटी घालू शकतात. डाळीला चांगल्या दोन-तीन उकळ्या फुटल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला.
त्यावर झाकण ठेवा. त्यामध्ये चिमूटभर कसुरी मेथी चांगली चुरून वरतून घालावी आणि झाकण ठेवावे.आता वरून चिरलेली कोथिंबीर घाला.
एका कढईमध्ये कडकडीत गरम करून त्यामध्ये थोडे जिरे मोहरी घालून लसणाची काप करून घाला . पाव चमचा हिंग घाला.
रसगुल्ला मिरच्या घालाव्यात. ही कडकडीत फोडणी आपण केलेल्या दाल तडक्यावर घालावी. आपला दाल तडका तयार आहे.
हा दाल तडका तुम्ही चपाती सोबत किंवा जीरा राईस किंवा साध्या भात सोबत खाऊ शकतात .
(यामध्ये मी रसगुल्ला मिरचीचा वापर केलेला आहे तुम्हाला जर गोटा मिरची मिळत असल्यास तुम्ही गोटा मिरचीचा वापर करा कारण ती दिसायलाही सुरेख लागते तसेच फिकीही असते आणि चवीलाही छान असते. गोटा मिरची ही बोरी प्रमाणे असते छोटे बोर त्याप्रमाणे ही मिरची असते.)

टिप्स::
यामध्ये मी मुगाची डाळ तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर आवडत असल्यास यामध्ये तुम्ही पाव वाटी मसुरीची डाळ ही घालू शकतात तसेच चवळीची डाळ ही घालू शकतात त्यामुळे पौष्टिकता अजूनच वाढते.
वेळ व परि माण::
तयारीची वेळ ३० मिनिटे
एकूण वेळ १ तास
परिमाण:५ जणांसाठी
