ओरिओ शेक

प्रस्तावना::
ओरिओ शेक हे सध्या प्रचलित असलेले प्यायचे पेय आहे. जे की लहान मुलांना अत्यंत प्रिय आहे. परंतु बाहेर जाऊन पिण्यापेक्षा घरी बनवलेले पेय कधीही चांगले. कारण आपण वापरलेल्या वस्तू या कोणत्या दर्जाच्या आहेत हे आपणास माहीत असते.
साहित्य::

*एक ग्लास दूध
*दोन बिस्कीटचे ओरिओचे पुडे
* अर्धी वाटी साईची क्रीम
* दोन चमचे साखर
कृती::
एका पातेल्यात एक ग्लास दूध गरम करून दोन ते तीन तास फ्रीजमध्ये थंडगार होण्यास ठेवा.
दोन ओरिओ बिस्किटचे पुडे घ्या. पांढरा रंगाची क्रीम बाजूला काढा. दोन बिस्किटे गार्निशिंग साठी बाहेर काढून ठेवा.
उरलेले बाकी बिस्किटे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पूड करा.
आता त्या फुड मध्ये दोन चमचे साखर घाला पुन्हा मिक्सरला फिरवून घ्या.
आता त्यामध्ये आपण बाजूला काढलेली ओरिओची पांढरी क्रीम तसेच साईची अर्धी वाटी क्रीम घालून चांगले मिक्सरला फिरवून घ्या.
सर्वात शेवटी त्यामध्ये एक ग्लास दूध घालून हे सर्व मिश्रण चांगले मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
एका हँडलच्या कपामध्ये चॉकलेट सिरप आजूबाजूने पसरवून घ्या. ते मी फोटोमध्ये दाखवलेलेच आहे.

आता त्यामध्ये आपण तयार केलेले ओरिओ चे मिश्रण घाला. त्यावर गार्निशिंग म्हणून एक आपण ठेवलेले बिस्किट घाला.
एका बिस्किटाला थोडा बारीकसा कट घालून साईडला तुला असा जातो बिस्कीट लावा. आता आपला ओरिओ शेक पिण्यास तयार झालेला आहे.

लहान मुलांना हा ओरिओ शेक अत्यंत आवडतो. यामध्ये तुम्ही मिक्सरमध्ये घालताना त्यामध्ये चॉकलेट सिरपही घालू शकतात. त्यामुळे दार चॉकलेटचा फ्लेवर निर्माण होईल. किंवा त्यामध्ये डेरी मिल्क कॅडबरीचे तुकडे करूनही तुम्ही घालू शकतात.
टिप्स::
ओरिओ शेक करताना आपण त्यातली पांढरी क्रीम ही वेगळी केली आहे कारण एकचदा वाटताना कधी पण त्याचा गोळा तयार होईल आणि बिस्किटांची पावडर ही व्यवस्थित बारीक होणार नाही म्हणून पांढरी क्रीम ही वेगळी करून आधी बिस्किटांचा चुरा करून घ्यावा.
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ:: २० मिनिटे
परिमाण: १ मुलासाठी
