बिबडे घाटा
प्रस्तावना::

खानदेशी या भागामध्ये बिबडे भरपूर प्रमाणात केले जातात… ज्वारी गहू आणि तांदळापासून केला जाणारा हा पापड आहे… याचा काटा शिजवून आपल्याला बेबळे थापावे लागते…. तेल घेऊन आपण खाऊ शकतो…..
बिबड्यांचा पीठ बनवण्याचे साहित्य:::
- एक किलो ज्वारी
- एक किलो गहू
- पाव किलो तांदूळ

ज्वारी गहू ही वेगवेगळ्या पातेल्यांमध्ये भिजत घाला… ज्वारी आणि गहू चार ते चार दिवस भिजू घाला… त्यानंतर दोघेही स्वच्छ धुऊन घ्या…
ज्वारी धुतल्यानंतर पुन्हा मध्ये चांगली दिसला सुकवून घ्या… आणि चक्की मधून चरमरी दळून घ्या….. गहू चार दिवस भिजल्यानंतर ते मिक्सरवर वाटून घ्या…
मधून चीक वेगळा करून घ्या…. चिक गाळल्यानंतर तो एका परातीमध्ये सुकवण्यास ठेवा.. दोन ते तीन दिवसात हा चीक चुकतो….
आता तांदूळ दोनच दिवस आपल्याला भिजत ठेवायचे आहे…. दोन दिवस तांदूळ भिजल्यानंतर ते धुऊन वाळत घालून त्याचे जाडसर पीठ करायचे आहे…….
ज्वारी गहूचा चिकाचे पीठ आणि तांदळाचे पीठ हे तीनही पीठ आपल्याला एकत्र करायचे आहे… बिबळ्यांचे रिमिक्स आपले तयार झालेले आहे…
बिबडे घाटा करण्यासाठी साहित्य::
- तीन वाटी पीठ
- 20 लसूण पाकळ्या
- आठ ते दहा सुकलेल्या मिरच्या
- एक चमचा जिरे
- दीड चमचा तीळ
- अर्धा चमचा शो प
- एक चमचा धनापूड
- मीठ
- पाणी

घाटा बनवण्याची कृती:::
घाटा बनवण्यासाठी इथे मी तीन वाट्या पीठ एक ते दीड ग्लास पाण्यामध्ये भिजवून घेतले आहे…
त्यानंतर चटणी तयार करताना मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाव चमचा जिरे अर्धा चमचा धनापूड आणि पाव चमचा शोप आणि मिरच्या याचे थोडे पाणी घालून जाडसर वाटण करून घ्या….
आता एका कुकरमध्ये आपण जे रवण तयार केले आहे त्याच्या तीन पट इतके पाणी घाला… पाणी घातल्यानंतर त्याला चांगल्या उकड्या येऊ द्या….
चांगल्या उकळ्या आल्यानंतर त्यातील एक पट पाणी काढून घ्या… त्यामध्ये चटणीचे वाटण घाला आणि चवीप्रमाणे मीठ घाला….
आता या मिश्रणामध्ये घाटाचे मिश्रण चाटूच्या साह्याने मिक्स करून घ्या… यामध्ये गाठी होऊ देऊ नका एकाच दिशेने पटापट मिक्स करून घ्या….

सतत या मिश्रणाला घोटत रहा…. आता साधारण वीस मिनिटे काटा शिजू द्या.. दहा मिनिटे झाल्यानंतर घाटा पुन्हा घोटून घ्या ……….
आता घाटाघट्ट वाटत असल्यास त्यामध्ये आपण काढलेले उकळलेले गरम पाणी घाला…, आणि पुन्हा पाच मिनिटे घाटा चांगला शिजू द्या…

आपल्या घरचा चांगला शिजू द्यायचा आहे…. त्यानंतर त्यामध्ये दीड चमचा तीळ पाव चमचा शो प अर्धा चमचा जिरे घाला.. …
आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटं शिजू द्या आपला घाट आता तयार झालेला आहे…,.
आता आपला घाटा खाण्यास तयार झालेला आहे… यावर तुम्ही तेल घेऊन सुद्धा खाऊ शकतात…
तसेच ओल्या ओढणीवर किंवा कपड्यावर तुम्ही बिबडे थापून घेऊ शकतात…

टिप्स:::
घाटा करताना मिश्रण घातल्यानंतर पटापट घोटून घ्यावे नाहीतर गाठी तयार होतील….
