मशरूम फ्राय

by Vaishali Chaudhari
12 views

मशरूम फ्राय

प्रस्तावना:::

मशरूम फ्राय

मशरूम मध्ये खूप विटामिन्स असतात त्यामुळे ते हाडे मजबूत होण्यासाठी उपयोगी असतात…

साहित्य::

मशरूम फ्राय – फोटो 2
  • पाच ते सहा मशरूम
  • फोडणीसाठी तेल
  • जिरे
  • हळद
  • तिखट
  • मीठ
  • कोथिंबीर
  • चाट मसाला

कृती:::

सर्वप्रथम मशरूम दोन ते तीन पाण्यामधून स्वच्छ धुऊन घ्या… मशरूम निवडताना मशरूमचा खालील भाग एकदम पॅक हवा…

मशरूम उघडलेले नको…. मशरूम करताना लंबी काम करा .. जेणेकरून मशरूम चा आकार आपल्याला फ्राय केल्यानंतरही दिसेल….

आता मशरूम दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ धुतल्यानंतर आपण कापून घेतले आहे…. कढईमध्ये थोडे तेल गरम करा….

तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये जिरे घाला… जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये मशरूम घाला….

मशरूम फ्राय – फोटो 3

त्यावर पाव चमचा हळद अर्धा चमचा तिखट चवीप्रमाणे मीठ घाला…. आणि थोडासा पाण्याचा शिपका घालून… दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून चांगले शिजू द्या…

मशरूम मधील पाणी सगळे निघून जाऊ द्या… मशरूम लगेचच शिजतात…. ते जास्त वेळ शिजवावे लागत नाही….

मशरूम फ्राय – फोटो 4

आणि आटल्यानंतर आपले मशरूम तयार झाले आहे…. आतापर्यंत त्यावर चिरलेली कोथिंबीर आणि चाट मसाला घाला… आणि आपली मशरूम खाण्यास तयार झाली आहे…..

टिप्स::: मशरूम जास्त वेळ शिजवू नका… ते लगेच शिजतात….

झटपट मशरूम फ्राय – चवदार आणि कमी वेळात

मशरूम फ्राय ही अत्यंत झटपट होणारी भाजी आहे. कांदा-टोमॅटो न वापरता फक्त जिरे, हळद, तिखट आणि चाट मसाल्यात मशरूमची मूळ चव जपली जाते. स्टार्टर म्हणून, चपाती-पराठ्यासोबत किंवा चहाच्या वेळी नाश्ता म्हणून हे फ्राय छान लागते.

चांगल्या मशरूम फ्रायसाठी टिप्स

  • मशरूम घेताना ताजे, घट्ट आणि पांढरे घ्या; दाबल्यावर ते मऊ किंवा काळसर वाटत असतील तर घेऊ नका.
  • मशरूम जास्त वेळ पाण्यात भिजवू नका; पटकन धुवून लगेच पुसून घ्या, नाहीतर ते पाणी शोषून घेतात.
  • मशरूम लांबट कापल्यास तळल्यानंतरही त्यांचा आकार दिसतो.
  • मशरूममधून पाणी सुटते; हे पाणी पूर्ण आटेपर्यंत परता, म्हणजे फ्राय कोरडा आणि खमंग होतो.
  • मशरूम लवकर शिजतात; जास्त शिजवल्यास ते रबरासारखे होतात.

बदल (व्हेरिएशन)

  • वरून लिंबू पिळल्यास चव आणखी खुलते.
  • बारीक चिरलेली सिमला मिरची किंवा कांदा घालून वेगळी चव करता येते.
  • काळी मिरी पूड आणि थोडे लसूण घातल्यास गार्लिक पेपर मशरूम होतात.

सोबत काय खावे?

गरम चपाती, पराठा, डाळ-भात किंवा नुसता स्नॅक म्हणूनही खाता येतो.

साठवण

मशरूम फ्राय ताजाच खावा. उरल्यास फ्रिजमध्ये झाकून ठेवा आणि एका दिवसात खा; गरम करताना जास्त शिजवू नका.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

प्र. मशरूम धुणे गरजेचे आहे का?

उ. हो, मातीमुळे ते स्वच्छ करावेत; पण थोडेच पाणी वापरून पटकन धुवा आणि लगेच पुसा.

प्र. मशरूम तळताना पाणी का सुटते?

उ. मशरूममध्ये भरपूर पाणी असते. मोठ्या आचेवर परतल्यास ते पटकन आटते.

प्र. तेल जास्त लागते का?

उ. नाही, थोडे तेलही पुरे; मशरूम स्वतःचे पाणी सोडतात.

प्र. चाट मसाला नसेल तर?

उ. थोडे आमचूर पूड किंवा लिंबाचा रस वापरता येईल.

You may also like

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.