मोमोज ची चटणी

साहित्य:::
५ टोमॅटो ५लसूण पाकळ्या ३ लाल मिरच्या १ चमचा साखर 1 चमचा ओरिगॅनो 1 चमचा सोया सॉस 5 लसूण पाकळ्या आणि पाव इंच अद्रकाचा तुकडा पेस्ट चिमूटभर मिरी पूड तेल चवीप्रमाणे मीठ
कृती::::
टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्या… पातेल्यात टोमॅटो लसूण पाकळ्या मिरची घालून ५ मिनिटे उकळून घ्यावे….
नंतर टोमॅटो ची साल काढून टोमॅटो काप करून घ्या…. टोमॅटो काप थंड करून घ्या….
नंतर मिक्सर च्या भाड्यात टोमॅटो मिरच्या लसूण घालून मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्या….
पातेल्यात १ चमचा तेल घालून त्यात अद्रक लसूण ची मिरची पेस्ट परतवून घ्या…आणि केलेली टोमॅटोची पेस्ट घाला …

त्यात साखर घाला… 1 चमचा सोया सॉस चिमूटभर मिरी पूड आणि ओरिगानो चवीप्रमाणे मीठ घाला…

३ मिनिटे चटणी शिजवून घ्या…. गॅस बंद करा…आपली मोमोज ची चटणी तयार आहे…
ही चटणी तुम्ही स्टीम मोमो तसेच फ्राईड मोमो सोबत खाऊ शकतात….

वेळ आणि परिमाण::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ::२० मिनिटे
परिमाण:: ३ व्यक्तींसाठी
