पाणीपुरीचे आंबट गोड पाणी
प्रस्तावना:::
जसे पाणीपुरी सोबत तिखट पुदिन्याचे पाणी असते तसेच यासोबत आंबट गोड चिंचेचे पाणी सुद्धा असते… जी की लहान मुलांना अत्यंत प्रिय असते ते पण आज आपण बघणार आहे….
साहित्य::

- एक वाटी चिंच
- एक वाटी साखर किंवा गूळ
- पाव चमचा लाल तिखट
- अर्धा चमचा मीठ
कृती:::
गरम पाण्यामध्ये चिंच साधारण अर्धा तास आपल्याला भिजत घालायचे आहे… या चिंचांमधील बिया आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत…
इथे चिंच मी न शिजवताच पाणी तयार करणार आहे.. आता हे चिंचेचे कोड सह आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे..
ही पेस्ट आता चाळणी मधून चाळून घ्यायची आहे… ती एका पातेल्यामध्ये काढून… ही काढलेल्या पेस्टमध्ये आपल्याला थोडे पाणी घालायचे आहे..
चिंचेची पेस्ट शिजवण्यासाठी ठेवायची आहे. चिंचेच्या चटणीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा तिखट आणि अर्धा चमचा मीठ घालायचे आहे…

आता हे पाणी चांगले शिजू द्यायचे आहे… चिंचेच्या चटणीला साधारण पाच ते सहा उघड्या येऊ द्या…. हे चिंचेची चटणी साधारण पाच ते सहा महिने आरामात टिकते….
आपली आंबट गोड चिंचेची चटणी किंवा चिंचेचे पाणी तयार झालेले आहे… तुम्ही कुठल्याही चाट वर किंवा ढोकळ्यांसोबत किंवा पाणीपुरी सोबत खाऊ शकतात….
तर एन्जॉय करूया आंबट गोड चिंचेची चटणी किंवा पाणी
पाणीपुरी मध्ये भरल्या जाणारे वाटण किंवा फिलिंग
प्रस्तावना::

पूर्वी पाणीपुरी मध्ये फक्त बटाट्याचा लगदा भरला जायचा.. आता वाटाण्याचा रगडा तसेच वाफवलेले काळे चणे सुद्धा पाणीपुरीच्या पुरी मध्ये भरले जातात.. आणि बटाट्याचा लगदा अजून चवदार कसा लागेल ते आपण बघूया..
साहित्य:::

- एक वाटी हरभरे रात्री भिजवून ठेवलेली
- चार मोठे बटाटे
- एक वाटी ताजे वाटाणे
- 15 ते 20 पुदिन्याचे पाने
- पाच ते सहा हिरव्या मिरच्या
- मीठ
- पाव चमचा तिखट
- पाव चमचा हळद
- आणि काळे मीठ
कृती:::
प्रथम काळे चणे रात्रभर भिजवलेले हवे… हे काळे चणे साधारण पाच ते सहा शिट्ट्या घेऊन चांगले वाफवून घ्या…
चणेनंतर त्यामधील पाणी काढा… चण्यांना काळी मीठ लावा… आपले चणे तयार झालेले आहे… आता आपल्याला बटाटे आणि वाटाणे हे कुकरमध्ये तीन ते चार शिट्यांवर वाफवून घ्यायचे आहे….
वाटाणे वाफवल्यानंतर त्याचा स्मॅशरच्या साह्याने रगडा तयार करून घ्या… रगडा तयार झाल्यानंतर या रव्यामध्ये थोडे पाणी घाला…
त्यानंतर गॅसवर त्याला चांगला शिजवून घ्या… तीन ते चार मिनिटे उकळी येईपर्यंत शिजवा त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा तिखट चवीप्रमाणे मीठ घालून उकड्या आल्यानंतर गॅस बंद करा….
आपला पाणीपुरीच्या पुरी मध्ये भरल्या जाणाऱ्या गरमागरम वाटाण्याचा रगडा तयार आहे….बटाटे सोलून घ्या… बटाटे सोलल्यानंतर ते सर्व बटाटे स्मॅश करून घ्या…
. बटाट्याचे लगदा तयार करून घ्या… त्यानंतर मिक्सरमध्ये पुदिन्याचे पाणी आणि पाच हिरव्या मिरच्या याचे जाड मोठे भरड करून घ्या..

हे पुदिनाचे आणि मिरचीचे भरड बटाट्याच्या डब्यामध्ये घाला आणि चवीप्रमाणे मीठ घाला आणि सर्व लगदा एकत्र करून घ्या…
आता आपले पाणीपुरीत भरायचे फिलिंग तयार झालेले आहे… पाणीपुरीचे पुरी घ्या त्यामध्ये बटाटा घाला काळे चणे घाला…

आणि गरमागरम वाटाण्याचा रगडा घाला आणि त्यामध्ये थोडी गोड पाणी घाला आणि तिखट पाणी घालून आपली पाणीपुरी खाण्यास तयार झालेली आहे…
तर आपण एन्जॉय करूया आंबट गोड अशी पाणीपुरी…..
पाणीपुरीचे झणझणीत आणि पुदिना पाणी
प्रस्तावना::

पुरी मध्ये पुदिनाचे पाणी आणि ते पाणी झणझणीत आणि चवदार असे हवे तेव्हा पाणीपुरीची मजा काही वेगळीच असते… लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारी अशी ही पाणीपुरीचे पाणी कसे तयार करायचे ही रेसिपी आज आपण बघणार आहे….
साहित्य:::

- एक वाटी पुदिना
- अर्धी वाटी कोथिंबीर
- अर्धी तोतापुरी कैरी
- पाच ते सहा हिरव्या बारीक मिरच्या
- अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
- दोन चमचे चाट मसाला
- एक चमचा मीठ
- एक चमचा काळे मीठ
- एक चमचा जिरा पावडर
कृती::
सर्वप्रथम पुदिनाचे पाणी तोडून त्याला व्यवस्थित निवडून घ्या… तसेच कोथिंबीर तोडून घ्या.. कैरीची साल काढून घ्या..
आणि अर्ध्या कैरीचे बारीक बारीक काप करून घ्या.. त्यानंतर अद्रकाचा तुकडा सोलून त्याचे तुकडे करून घ्या..
आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पुदिना अर्धी वाटी कोथिंबीर अर्ध्या कैरीचे काप पाच ते सहा हिरव्या मिरच्या अद्रकाचे तुकडे घालून मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घ्या..
त्यामध्ये थोडे पाणी घाला म्हणजे पेस्ट एकदम बारीक होईल….. ही पेस्ट एका पातेल्यामध्ये काढा… ही पेस्ट तुम्ही पाणी घालून चाळणी मधून गाळून घेऊ शकतात…
पण जर पेस्ट एकदमच बारीक झाली असल्यास गाळण्याची गरज नाही…ही पेस्ट काढल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे चाट मसाला एक चमचा काळे मीठ आणि एक चमचा जिरे पावडर घाला….
आणि हे व्यवस्थित एकत्र करून घ्या… इथे मी चाट मसाल्याचा वापर केलेला आहे… तुम्ही इथे दोन चमचे पाणीपुरीच्या पाणी मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता…

पाणीपुरीचा मसाला कसा तयार करायचा त्याची रेसिपी लवकरच मी टाकेल… आता हे सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन ग्लास थंडगार असे पाणी घाला…
आपली पुदिनाचे पाणी तयार झालेले आहे.. तुमच्याकडे कैरी नसल्यास तुम्ही एक लिंबाचा रस या पाण्यामध्ये घालू शकतात…
किंवा आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकतात…. आमचूर पावडर एक चमचा इतकी घालायची आहे…. मी इथे सर्व ऑप्शन तुम्हाला सांगितलेले आहे…
आता आपली पुदिनाचे थंडगार असे पाणी तयार झाले आहे… हे पाणी आपण पाणीपुरींना वापरू… थंडगार असे पाणीपुरीचे पाणी किंवा पुदिन्याचे पाणी तयार आहे….

