पनीर मसाला

by Vaishali Chaudhari

पनीर मसाला


प्रस्तावना::


पनीर मसाला ही लहान मुलां ची आवडती भाजी आहे. पनीर यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. जी तुम्ही लहान मुलांना टिफिन मध्ये देऊ शकतात.


साहित्य:

  • 250 ग्रॅम पनीर,
  • दोन कांदे ,
  • एक टोमॅटो,
  • अर्धी वाटी घट्ट दही,
  • दहा लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा,
  • पाव चमचा हळद
  • एक चमचा तिखट,
  • पाव चमचा गरम मसाला
  • मीठ
  • फोडणीसाठी तेल
  • जिरे मोहरी
  • कसुरी मेथी
  • पाणी


कृती::


सर्वप्रथम पनीरचे कापून तुकडे करून घ्या. एका कढईमध्ये थोडे तेल घालून पनीरवर मीठ आणि थोडे तिखट घालून परतवून घ्या.

जास्त परतवू नका ते कडक होतील लगेच गॅस बंद करा.कांदा बारीक चिरून घ्या .

तसेच टोमॅटो हे बारीक चिरून घ्या. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा लसणाच्या पाकळ्या अद्रक याची बारीक पेस्ट करून घ्या.

ती एका वाटीमध्ये काढून घ्या. टोमॅटोची पेस्ट करून घ्या. एका वाटीमध्ये काढून घ्या. आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा.

त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला. त्यामध्ये कांद्याची पेस्ट घाला. आता तिला व्यवस्थित परतून घ्या .

त्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घाला ती परतवून घ्या. चटणी परतल्यानंतर त्यामध्ये हळद तिखट गरम मसाला घालून परतवून घ्या.

त्यामध्ये गरम केलेले पाणी घाला ग्रेव्ही ज्याप्रमाणे हवी त्याप्रमाणे पाणी घालावे. आता त्यामध्ये फेटलेले घट्टसर दही घाला.

दही चांगले फेटलेले हवे. नाहीतर भाजीमध्ये दह्याची गोळे गोळे दिसतील. भाजी चांगली परतवून घ्या आता भाजीला तेल सुटले असेल.

त्यावर दोन मिनिटे झाकण ठेवा. चवीप्रमाणे त्यावर मीठ घाला. त्यामध्ये परतवलेले पनीर घाला. वरून चिरलेली कोथिंबीर घाला.

आता दोन चिमट्या कसुरी मेथी घेऊन हातावर चांगले चुरून घ्या आणि ती भाजीमध्ये घाला हळूच परतवून त्यावर झाकण ठेवा.

पाच मिनिटे भाजी वाफल्यानंतर भाजीचा गॅस बंद करा. आपले मसाला पनीर तयार झालेले आहेत. हे मसाला पनीर तुम्ही चपाती सोबत किंवा फुलक्या सोबत तसेच तंदुरी रोटी सोबत सुद्धा खाऊ शकतात.

आपण जिरा भातासोबत सुद्धा आपण मसाला पनीर खाऊ शकतो. येथे मी दह्याचा वापर केला आहे तुम्हाला दही आवडत नसल्यास तुम्ही एक वाटी दुधाचा वापर सुद्धा करू शकतात.

तसेच घट्टपणासाठी आठ ते दहा काजू तुम्ही चटणी मध्ये वाटू शकतात. काजू मुळे भाजीला चवही चांगली येते.

येथे मी परतवलेले पनीर घातलेले आहे तुम्ही बिना परतवलेले पनीर काप करून घालू शकतात. आणि ते नंतर भाजीमध्ये वाफवू दिले तरी चालू शकते.


टिप्स::

पनीर मसाला करताना दही घातल्यानंतर भाजीचा मसाला हळूहळू हलवावा. नाहीतर भाजी फाटण्याची शक्यता असते. येथे तुम्हाला दही दूध आवडत नसल्यास तुम्ही वापर नाही केला तरी चालेल.

वेळ व परि माण::


तयारीची वेळ :३० मिनिटे
एकूण वेळ: 40मिनिटे

परिमाण:५ जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4331

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.