🥘 १. रेसिपीचं नाव
पिठले
📸 २. फोटो / फीचर्ड इमेज : रेसिपीचा एक सुंदर, नैसर्गिक फोटो —

✨ ३. प्रस्तावना
थोडक्यात त्या पदार्थाबद्दल माहिती — हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,
📝 ४. साहित्य (Ingredients

- १ वाटी बेसन,
- १ कांदा,
- १ टमाटर,
- ६ लसूण पाकळ्या,
- अर्धा इंच आले तुकडा,
- हळद,
- जीरे-मोहरी
- कढीपत्ता
- 4 बारीक मिरच्या
- १ जाड लाल मिस्ची,
- कोथींबीर,
- ४ टेबलस्पून तेल,
- मीठ,
- पाणी
कृती:
- एक टमाटर एक कांदा चांगला बारीक चिरून घ्या. मिरचीचे बारीक असे तुकडे करून घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट करून घ्या.
- एका साईडला छोट्या पातेल्यामध्ये गरम पाणी करून घ्या. एक कढईमध्ये चार पळी तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला.
- त्यामध्ये कढीपत्ता मिरच्या परतून घ्या. ती परतल्यानंतर त्यात कांदा आणि टमाटर परतून घ्या. त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घाला तीही परतवून घ्या.
- त्यात हळद घालून परतून घ्या. त्यामध्ये आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये गरम केलेले पाणी घाला हे पाणी आपण गरजेप्रमाणे घालू शकतो .
- जसे घरात दोन मेंबर असतील तर आपण एक ग्लास पाणी वापरू शकतो आणि पाच मेंबर असतील तर दोन ग्लास पाणी वापरू शकतो.
- पाण्याला चांगली खडखडीत उकळी येऊ द्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घाला. त्यामध्ये एक वाटी बेसन घालून गुठळ्या न होऊ देता घोटून घ्या.
- हे बेसन घालताना एक वाटीतले थोडे थोडे बेसन घालून घोटत राहावे म्हणजे गुठळ्या होत नाही एकदम एक वाटी बेसन टाकू नका थोडे थोडे घालून घोटून घ्या.
- आता याला चार ते पाच उकळ्या येऊ द्या. आपल्याला पिठले घट्ट वाटत असल्यास तुम्ही पाव ग्लास गरम पाणी घालून पुन्हा ते पातळ करू शकतात.
- आता मंद आचेवर तीन मिनिटे ते शिजू द्या आणि त्यामध्ये कोथिंबीर घाला.
(वरील पध्दतीने पिठले केल्यास गुठळ्या होत नाहीत(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)
💡 ६. टिप्स (Cooking Tips)
पिठले करताना कधी कधी आपल्या गुठळ्या जास्तच होतात त्यासाठी एक सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगते ती म्हणजे अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये एक वाटी पीठ चांगले गुठळ्या न होऊ देता मोडून घ्या आणि कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये अर्धा ग्लास उकडलेले पाणी घाला .त्यानंतर त्यामध्ये बेसनाचा हा आपण बनवलेला गोल घाला हे पिठले अत्यंत चिकन येते. यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी होत नाही.
