शाही पनीर मसाला
प्रस्तावना::

शाही पनीर मसाला ही रेस्टॉरंट स्टाईल भाजी असून त्यामध्ये आपण साजूक तुपाचा वापर केला आहे त्यामुळे त्याची पौष्टिकता अजूनच वाढते. शिवाय पनीर मधून भरपूर प्रमाणात प्रोटीन प्राप्त होते.
साहित्य::

- 250 ग्रॅम पनीर
- तीन कांदे
- एक मोठा टोमॅटो
- पंधरा ते वीस लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अदरकाचा तुकडा
- दोन बेडकी मिरची
- पाव चमचा हळद
- एक चमचा तिखट
- मीठ
- तीन हिरवी वेलची
- एक तेजपान मोठे
- एक तुकडा दालचिनीचा
- एक वाटी भरून फ्रेश मलाई
- आठ ते दहा काजू
- फोडणीसाठी साजूक
- तूप
- कोथिंबीर
कृती::
प्रथम दोन कांदे चिरून घ्या एक कांदा अत्यंत बारीक चिरून घ्या. एक टोमॅटो चिरून घ्या. कोथिंबीर चिरून घ्या.
एका पॅनमध्ये एक चमचा तूप घाला त्यामध्ये एक तेजपान तिने हिरवी इलायची दालचिनीचा तुकडा परतून घ्या.
त्यात कांदा टोमॅटो लसूण पाकळ्या सात ते आठ काजू थोडे पाणी घालून परतून घ्या कांदा आणि टोमॅटो शिजेपर्यंत परतून घ्या.

आता हे परतलेले कांदा टोमॅटोचे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक सर पेस्ट करून घ्या. पनीरचे चौकोनी काप करून घ्या.
पॅनमध्ये एक चमचा तूप घालून पनीरचे तुकडे परतवा त्यामध्ये थोडे तिखट मीठ घाला थोडा ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घ्या आणि एका डिशमध्ये काढून घ्या.
आता एका पॅनमध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप घालून त्यामध्ये जिरे घालून फोडणी घाला. त्यामध्ये एक कांदा आपण जो बारीक चिरलेला आहे .
इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे तुम्हाला साजूक तूप आवडत नसल्यास तुम्ही अमूल बटरचा वापर करू शकतात किंवा तेलाचाही वापर करू शकतात. पण तुपा ची अत्यंत अप्रतिम येते.
तो परतून घेऊन तो तांबूस रंगावर आला की त्यामध्ये चटणी घालून व्यवस्थित परतून घ्या. चटणीला थोडे तेल सुटेपर्यंत परतवत राहा.
चटणी मध्ये पाव चमचा हळद एक चमचा तिखट घालून व्यवस्थित परतवा. त्यामध्ये दोन ते तीन चमचे साधारण फ्रेश मलाई घाला.
हि मलाई मी ताज्या दुधावरचीच वापरलेली आहे. दुधावरची साय काढून एका वाटीत काढून घ्या आणि ती चमच्याच्या साह्याने फेटून घ्या किंवा विस्करच्या साह्याने फेटून घ्या .(तुम्हाला जर बाहेरची क्रीम वापरायची असली ती सुद्धा तुम्ही वापरू शकतात प्रमाण सारखेच राहील)
ती सॉफ्ट अशी क्रीम तयार होईल. आताही मला चटणी मध्ये घातल्यानंतर परतवून घ्या. त्यामध्ये थोडे पाणी घाला दोन ते तीन उकळ्या येऊ द्या.
आणि परतवलेले पनीरचे तुकडे त्यामध्ये घालून परतून घ्या. याला दोन ते तीन उघड्या आल्यानंतर त्यावर चिरलेली कोथिंबीर घाला. पनीरचे तुकडे मी इथे परतवून घेतलेले आहे.

तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही काम करून तसेच सुद्धा भाजीमध्ये घालू शकतात. पण पनीरच्या परतवण्यामुळे त्याला एक वेगळी टेस्ट येते.
आता आपले शाही पनीर रेसिपी तयार झालेली आहे. ती एका बाऊलमध्ये काढून त्यावर आपण जी क्रीम केलेली आहे ती त्यावर चमचा च्या साह्याने घालून त्यावर कोथिंबीर गार्निशिंग करावे.

तर मग शाही पनीर आपण चपाती सोबत किंवा फुलक्यासोबत नॉन रोटी सोबत तसेच तंदुरी रोटी सोबत खाऊ शकतो. या मैत्रिणींनो शाही पनीर खायला …..

टिप्स::
शाही पनीर मसाल्याची चटणी करताना कांदा टोमॅटो पॅनमध्ये परतून घेतलेला आहे कारण त्यातील कचवटपणा निघून जातो आणि मसाला लवकर परतवण्यास मदत होते.
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ:४० मिनिटे
परिमाण:३ व्यक्तीसाठी
