शेपू पालकाचे पिठले

by Vaishali Chaudhari

शेपू पालकाचे पिठले


प्रस्तावना::

शेपू पालकाचे पिठले अत्यंत पोष्टिक असून आपण रोजच्या जेवणात याचा समावेश करू शकतो.


साहित्य:

  • एक वाटी शेपू
  • एक जुडी तोडलेला पालक
  • पाच ते सहा पाने आंबट चुक्याची पाने
  • एक कांदा
  • एक टोमॅटो
  • आठ हिरव्या मिरच्या
  • आठ लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • एक चमचा तिखट
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा काळा मसाला
  • मीठ
  • फोडणीसाठी तेल
  • जिरे मोहरी


कृती::


शेपू पालक आणि आंबट चुक्याची पाने स्वच्छ धुऊन घ्या आणि बारीक अशी चिरून घ्या एक कांदा बारीक चिरून घ्या.


एक टोमॅटो बारीक चिरून घ्या मिरच्यांचे काप करून घ्या तसेच लसूण अद्रकाची पेस्ट करून घ्या. हे सर्व झाल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करा.

कडकडीत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला. सिजर त्यानंतर हिरव्या मिरच्या परतून घ्या .

हिरव्या मिरच्या परतल्या नंतर कांदा आणि टोमॅटो परतून घ्या. त्यामध्ये शिकलेले शेपू पालक आंबट चुक्याची पाने घालून व्यवस्थित परतून घ्या.

हे मिश्रण साधारणता तेल सुटेपर्यंत परतवत राहा. आता आपल्या मसाल्याला तेल सुटलेले आहे त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा तिखट पाव चमचा गरम मसाला घालून पुन्हा परतून घ्या.

आता यामध्ये एक ते दीड ग्लास गरम पाणी घाला. आपले मिश्रण उकडल्यानंतर चांगल्या चार ते पाच उकळ्या येऊ द्या.

त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला. त्यामध्ये बेसन पीठ मोडून एकत्र करून घ्या. बेसनाच्या गुठळ्या होऊ देऊ नका चमच्याने पटापट ढवळा.

त्यामुळे गुठळ्या होणार नाही. बेसन पिठाच्या गुठळ्या होऊ नये म्हणून मी एक टिप्स शेअर करणार आहे. या मिश्रणाला चांगल्या पाच ते सहा उकड्या येऊ द्या.

आणि त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला. चांगल्या दोन-तीन पुढे येऊ द्या आणि क्लास बंद करा. शेपू पालकतयार झालेले आहे.

हे पिठले तुम्ही भाकरी चपाती किंवा बाजरीची भाकरी यासोबत तुम्ही खाऊ शकतात…..


टिप्स:

जर तुम्हाला मसाल्यामध्ये बेसन मोडता येत नसेल तर तुम्ही एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये बेसनाचा घोल बनवा. आणि जे आपण मसाल्याच्या मिश्रणाचे पाणी केले आहे त्यामध्ये हा बेसनाचा गोल घाला आणि बेसन हलवून घ्या. तुम्हाला डायरेक्ट बेसन म्हणण्याची गरज नाही हि पद्धत तुम्ही वापरू शकतात. यामुळे पिठले एकही गुठळी होत नाहीत.

वेळ व परिमाण::


तयारीची वेळ: २०मिनिटे
एकूण वेळ :४०मिनिटे
परिमाण:४व्यक्तींसाठी

https://youtu.be/NAICvSu2iKU

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.