🥘 १. रेसिपीचं नाव
शेव-भाजी
📸 २. फोटो / फीचर्ड इमेज : —

✨ ३. प्रस्तावना
खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,
📝 ४. साहित्य (Ingredients)
१ मोठा कांदा,
१५-२० खोब्रा काप,
४ लाल रसगुल्ला मिस्ची,
८ लसूण पाकळ्या,
अर्धा इंच आlले अद्रक तुकडा,
तेल,
गरम मसाला,
१ छोटा चमचा तिखट,
पाणी (गरजेनुसार)
मीठ, (चवीनुसार)
४ पळी तेल,
शेवभाजी गाठी शेव, ( ५० ग्राम)
कोथींबीर (गरजेनुसार )
🔥 ५. कृती (Steps)
सर्वप्रथम १ मोठा कांदा कापून तव्यावर कांदा तांबूस रंगावर भाजणे.
नंतर खोब्रे पण तांबूस रंगावर भाजणे-लाल मिरची भाजून घेणे.

नंतर मिक्सरच्या भांड्यात कांदा, खोबरे, लाल मिरच्या, तिखट, आले-लसूण, गरम मसाला वाटून बारीक चटणी करून घ्यावी. पाणी टाकून चटणी वाटावी.(चटणी वाटताना सर्वप्रथम लाल मिरच्या वाटून घ्याव्या. नंतर त्यात भाजलेला कांदा, खोबरे, अद्रक लसूण घालून पाणी घालून वाटण करावे. भाजीची चटणी ही बारीकच असावी. त्यामुळे भाजीचा रस्सा घट्टसर चांगला होण्यास मदत होते.)

नंतर कढाईत तेल चांगले कडकडीत गरम झाले की चटणी घालून परतवा.(इथे गरम मसाला म्हणजे खडा मसाला वापरू शकतात किंवा काही रेडिमेड मसालाही तुम्ही वापरू शकतात. खडा मसाला म्हणजेच पाच मिरे, पाच लवंग दालचिनीचा तुकडा, दोन बाज्या दोन मसाला वेलची, एक चमचा शहाजिरे, एक चमचा खसखस इत्यादी साहित्य वापरून खडा मसाला आपण तयार करू शकतो. या मसाल्याचा वापर तुम्ही भाजी करू शकतात.)

चटणी चांगली तेल सुटेपर्यंत परतवा. कडेपासून चटणी वेगळी होण्यास सुरुवात होईल. आजूबाजूला लालसर असे तेल सुटेल.चटणीला तेल सुटले की त्यात गरजेनुसार गरम पाणी घालून पातळ करावी.
नंतर मीठ घालून उकूळ काढावी. नंतर त्यात शेव घालून ३ उकळ्या येऊ दया.भाजीला जाड शेव वापरावे . बारीक शेव हे भाजीमध्ये विरघळून जातात. त्यामुळे भाजी घट्ट बनते.
चिरलेली कोथींबीर घाला. शेवभाजी तयार आहे.(यामध्ये तुम्ही शेवटी थोडीशी कसुरी मेथी सुरून घालू शकतात यामुळे चव थोडी बाहेरच्या भाजी सारखी लागेल.)
(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)
💡 ६. टिप्स (Cooking Tips)
शेव भाजी ही आपण फुलक्या सोबत किंवा पोळी सोबत खाऊ शकतो. शेव भाजी सोबत साधा भात किंवा जीरा भात आपण खाऊ शकतो. हा भाजीचा प्रकार एकदम झणझणीत असा असतो. कुणीही एखादा पाहुणा घरी आलास पटकन अशी बनणारी ही शेव भाजी असते. हा पाहुणचार पाहुण्यालाही अत्यंत आवडतो.
