🥘 १. रेसिपीचं नाव
हिरवी मिरचीचा ठेचा
📸 २. फोटो / फीचर्ड इमेज :

✨ ३. प्रस्तावना
हे व्यंजन कमीत कमी वेळेत आणि झणझणीत आणि चविष्ट असा हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवितात, आणि अत्यल्प वेळेत बनणारा हे व्यंजन. सर्वाचा आवडीचा पदार्थ तो कळण्याची भाकरी ,बाजरीची भाकरी, मिक्स पिठाची भाकरी पराठे, पोळी, फुलका, गोड पोळ्या यासोबत खाता येतो.
झटपट होणारा असा भाजीची कमी दूर करणारा पदार्थ आहे.
📝 ४. साहित्य (Ingredients

- 4. जाड हिरव्या मिरच्या,
- 4 लसूण पाकळ्या,
- मीठ,
- कोथींबीर,
- तेल.
🔥५. कृती (Steps)::
जाड हिरव्या मिरच्या स्वच्छ धुऊन घ्या. पाच जाड हिरव्या मिरच्या तवा गरम करून त्यावर खरपूस अशा तेल घालून भाजून घ्या.
मिरच्या अल्टी पलटी करून खरपूस भाजा. कुठलीही बाजू कच्ची राहता कामा नये. मिरच्या तव्यावरून काढून घ्या.
आता अर्धी वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घ्या. शेंगदाणे खरपूस भाजल्यानंतर त्याचे साल काढून पांढरे स्वच्छ दाणे काढून घ्या.
एका बडगीमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या कुटून घ्या त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला.
आता हिरव्या मिरच्या कुटून घ्या. आता चिरलेली कोथिंबीर घालून तीही कुठून घ्या. मिरच्या कोथिंबीर आणि लसूण यांचे चांगले जाडवबारीक मिश्रण बनवा.
सर्वात शेवटी त्यामध्ये शेंगदाणे कुटून घ्यावे. शेंगदाणे जाडे मोठे कुटावे. त्याची चव चांगली लागते. आता आपल्या ठेचा तयार आहे.
तुम्ही कच्चं तेल घेऊन खाऊ शकतात. कळण्याची भाकरी आणि ठेचा एकदम जबरदस्त देत आहे.
तसेच कुठल्याही भाजीच्या दशम्या गोड दशम्या यासोबत ठेचा अत्यंत रुचकर लागतो. ज्यावेळेस भाजी नसते.
त्यावेळेस आपण हा ठेचा पोळी सोबत सुद्धा खाऊ शकतो. या ठेच्याला तुम्ही कडकडीत तेलाची फोडणी सुद्धा देऊ शकतात.
आपण इथे जी मिरची वापरली आहे ती अत्यंत जाड मिरची वापरलेली आहे कारण बारीक मिरची वापरल्यास पोटाला त्रास होऊ शकतो.
पण त्यांना सहन होत असेल त्यांनी मध्यम मिरच्या वापरल्या तरी चालते. ठेच्याला मिरचीचा खर्डा असेही म्हटले जाते.
चला तर मग गरमागरम भाकरी सोबत ठेचा एन्जॉय करूया. सोबतच ताकाची कढी. ताकाची कढीची रेसिपी पुढ च्या रेसिपी मध्ये दिलेली आहे.
चला तर खाली बघुयात आपण तयार झालेली गरमागरम ज्वारीची भाकरी ठेचा आणि कढी चला ताव मारुया………………………..

(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)
💡 ६. टिप्स (Cooking Tips)
ठेच्याला कडक तेलाची फोडणी दिल्यास ठेचा त्यात परतवल्यास. तू खमंग करून ठेवावा. हा तिला परतवलेला ठेचा. प्रवासामध्ये साधारण आठ ते दहा दिवस टिकून राहतो. एका पॅक डब्यामध्ये तुम्ही बाहेर गावाला घेऊन जाऊ शकतात ज्यावेळेस भाजी नसेल त्यावेळेस चपाती सोबत खाऊ शकता.
