महाराष्ट्रीयन झणझणीत हिरवा डाळ मेथ्या रस्सा

by Vaishali Chaudhari
581 views

रेसिपी नाव (Racipe Name)::

महाराष्ट्रीयन झणझणीत हिरवा डाळ मेथ्या रस्सा

फोटो (photo) :

महाराष्ट्रीयन झणझणीत हिरवा डाळ मेथ्या रस्सा

थोडक्यात(Introduction) :-

हा खान्देश मधील अस्सल मराठमोळी भाजीचा प्रकार आहे हा भाकरी मोडून काला करून खाऊ शकतात….

मेथ्या म्हटलं की कडुपण सर्वांच्या समोर येतो ……आता मेथ्याची भाजी मात्र या पद्धतीने केले तर कडू लागणार नाही…. चव पण एकदम भन्नाट लागेल ……आणि न खाणारे भाजी खातील …….

साहित्य(Ingridients)

महाराष्ट्रीयन झणझणीत हिरवा डाळ मेथ्या रस्सा – फोटो 2
  • १ चमच्या मेथ्या,
  • अर्धी वाटी तुरीची डाळ
  • १ कांदा,
  • १५-२० काप खोब्रा ,
  • २ चमचे शेगदाणे,
  • जीरे, मोहरी
  • अद्रक अर्धा इंच
  • १0 लसूण पाकळ्या
  • फोडणीसाठी तेल,
  • कोथींबीर,
  • ८ हिरव्या मिरची बारीक,
  • पाणी,
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा गरम मसाला
  • चवीप्रमाणे मीठ

कृती:(procedure):

प्रथम तव्यावर मेथ्या भाजून घेणे, जेणेकरून मेथ्यांचा कडूपणा दूर होईल आणि भाजी कडू लागणार नाही ……नंतर कुकरमध्ये मेथ्या व धुतलेली तुरीची डाळ त्यात पाणी घालून वरण लावतो, त्याप्रमाणे लावणे.

चटणी ची कृती :(Preparation of chatani )::

नंतर तव्यावर गरम चिरलेला कांदा थोडा काळसर होईल, तोपर्यंत भाजून घ्या …..त्यानंतर छान हिरव्या मिरच्या भाजून घ्या …..खोब्राचे काप भाजून घ्या ……शेंगदाणे भाजून घ्या….सर्व भाजून घेतल्यानंतर थंड होऊ द्या…..

मिक्सरच्या भांड्यात भाजलेले कांदा, खोब्रा, शेंगदाणे, मिरच्या, पाव चमचा थोडे जीर, लसूण , अद्रक कोथींबीर घालून चटणी वाटून घेणे. चटणी बारीक करावी, पाण्याचा वापर करावा.आपली भाजीची चटणी तयार झाली आहे ….

भाजीची कृती (Preparation of Sabji)::

नंतर काढाईत तेल घाला, तेल चांगले कडकडीत गरम करून घ्या ……त्यात जिरे,मोहरी लसणाचे काप फोडणी घाला….लसनाला तांबूस रंग आल्यावर त्यामध्ये चटणी घाला व हळद घालून परतवा….

पाव चमचा गरम मसाला घाला …..चटणीवर जो पर्यन्त तेल सुटत नाही तो पर्यन्त परता…चानीला छान असे तेल सुटले की मग त्यामध्ये मेथी व तुरीचे वरण थोडे रवीने घोंटून घ्या…..

नंतर हेडाळ मेथ्या चे मिश्रण चटणीत घालून परतवा….आणि एकत्र करा …..आणि त्यामध्ये एक ग्लास गरम पाणी भाजीत घाला …..

त्यात आपल्या आवडीनुसार पाणी घालून रस्सा करा ….पातळ हवा असेल तर अजून पाणी घाला ….

आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला …..आणि तीन ते चार उकळ्या येऊ द्या ….आणि भाजीचा gas बंद करा ….. दाळ मेथीची भाजी तयार आहे

डाळ मेथांची भाजी भाकरी पोळीसोबत एकदम उत्तम लागते …….

महाराष्ट्रीयन झणझणीत हिरवा डाळ मेथ्या रस्सा – फोटो 3

टिप्सः(Tips):

मेथ्या कच्च्या वापर करू नये, भाजी कडू होते मेथीला आधीच कडूपणा असतो त्यामुळे भाजून मगच उकळा……म्हणजे त्यामधील कडूपणा उकळून घ्या …..

वेळ व परिमाण(Time and Quantity)

तयारी १० मिनीटे

एकूण वेळ ४० मिनीटे

परिमाण ५ जणांसाठी

Tags/Keyword

, #SwaadGharCha, #IndianMeals, #GharKaKhana, #MaharashtrianThali, #MarathiFood, #HomemadeRecipe

You may also like

1 comment

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.