पुरणपोळी

by Vaishali Chaudhari
299 views


प्रस्तावना::

पुरणपोळी ही पारंपारिक पदार्थ असून तो पूर्वपार आजीच्या काळापासून तयार केले जाणारा पदार्थ आहे या पुरणपोळी प्रकारांमध्ये खापरावरची पुरणपोळी तसेच घरगुती केली जाणारी तव्यावर केली जाणारी पुरणपोळी असे दोन प्रकार आहेत. आपण आज घरगुती पुरणपोळीचा प्रकार बघणार आहोत. जी तव्यावर केली जाते.


साहित्य(पुरणासाठी) ::

  • एक किलो हरभऱ्याची डाळ
  • 850 ग्रॅम गूळ किंवा साखर
  • दहा ते पंधरा हिरवी वेलची
  • जायफळाचा तुकडा
  • पाणी


साहित्य (पोळीची कणिक)::

बारीक चाळलेली कणिक, हळद, मीठ ,पाणी


कृती::

सर्वप्रथम हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुऊन घ्यावी ती अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावी.

हरभऱ्याची डाळ भिजल्यानंतर कुकरमध्ये डाळ घालून त्यामध्ये संपूर्ण डाळ भिजेल आणि शिवाय दोन पेर पाणी वरती येईल इतपत पाणी घालावे.

कुकर बंद करावे. सुरुवातीला मोठ्या गॅसवर उकळी आली की लगेच गॅस सिम करून कुकरचं चांगल्या 10 शिट्ट्या होऊ द्या. साधारण पंचवीस मिनिटे डाळ शिजू द्यावी.

डाळ अत्यंत नरम व्हायला हवी. नंतर कुकर पूर्णपणे थंड होऊ द्या.

कुकर थंड झाल्यानंतर संपूर्ण वाफ निघाल्यानंतर कुकर चे झाकण उघडा.

जर कुकरमध्ये एक्स्ट्रा पाणी असेल ते काढून घ्या. उकडलेली डाळ आपण पुरण यंत्रातून काढून घेऊ शकतो. किंवा आता इलेक्ट्रिकची रवीचा वापर करू नये .

आपण डाळ लोणून घेऊ शकतो. डाळ इलेक्ट्रिकच्या रवीने लोनली की त्यामध्ये कुठलेही गुठळी राहत नाही. पुरण यंत्रातून आपण डाळ वाटून घेऊ शकतो.

नंतर गॅसवर एक कढई मंद आचेवर ठेवा.कढईमध्ये ही वाटलेली डाळ घालून त्यामध्ये किसलेला 850 ग्रॅम गूळकिंवा साखर घालावा. व डाळीचे मिश्रण सतत हलवावे.

गुळकिंवा साखर वितळल्यानंतर ते मिश्रण सतत ढवळत राहावे. हे मिश्रण मंद आचेवरच परतवावे लागते.

नाहीतर पुरण खाली कडेला लागू शकते. पुण्याचा गोळा होत आला की त्यामध्ये कुटलेली वेलची आणि जायफळ ची पूड घालावी. या पुण्यामध्ये चमचा उभा राहिला की पुरण झाले असे समजावे.

कारण पुरण जास्त आटू दिल्यास पुरणाचा भुगा होतो. पूर्ण पुरण आजूबाजूने सुटले की पुरण झाले असे समजावे.

कढईच्या वरच्या भागाला पुरण सुकलेले जमा होऊ लागते अशा वेळेस पुरण झाले असे समजावे.

नंतर पुरण हे दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये काढून थंड करून घ्यावे.(काही वेळेस गूळ टाकून पुरण शिजल्यानंतर पुरणयंत्रातून काढले जाते येथे मी पूर्ण टाकायच्या आधीच पुरण लोणून घेतले आहे.

यामुळे काम सोपे होते.) हे पुरण आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून याचा वापर लगेचच वापर करू शकतो.

फ्रिजमध्ये ठेवल्याने जर पुरण थोडे पातळ असल्यास घट्ट होण्यास मदत होते.

एका परातीत गाळलेली बारीक कणिक घ्या त्यामध्ये थोडीशी हळदीची चिमटी आणि मीठ घाला आणि मऊसूत कणिक मळून घ्या.

ही कणिक थोडीशी पातळसर असावी. यामुळे पुरणपोळी फुटत नाही. दहा पंधरा मिनिटे किंवा अर्धा तास ही कणिक चांगली मुरवत ठेवा.

कणिक मुरल्यानंतर त्याचा गोळा करून घ्या. तसेच पुरणाचे ही छोटे छोटे गोळे करून घ्या.

जेवढा कणकेचा गोळा तेवढ्याच पुरणाचा गोळा घ्या. आता कणकेच्या गोळ्याची पारी करून घ्या त्यामध्ये कोणाचा गोळा भरा. पुरणपोळी लाटून घ्या.

ही पोरं पुरणपोळी अत्यंत पातळ लाटली तरी चालेल. गॅसवर तवा ठेवून गॅस मध्यम आचेवर ठेवा.

त्यावर लाटलेली पुरणपोळी भाजून घ्या. पुरणपोळीला दोन्ही बाजूने तूप लावून घ्या. आता आपली पुरणपोळी तयार झालेली आहे.

आपण जी पुरणपोळी केली ती लाटल्यानंतर हाताच्या साह्याने लांब होऊ शकतो आणि ज्याच्याकडे खापर असल्यास ते खापर गॅसवर ठेवून त्यावर आपण पुरणपोळी भाजू शकतो.

ही खापरावरची पुरणपोळी हातावर केली जाते. खापरावरची पुरणपोळी ही चुल्ह्यावरही केली जाते. खापराच्या पुरणपोळीची घड्या पाडून घ्या.


टिप्स::

खापरावरची पुरणपोळी करताना पोळी पाटावर पुरणपोळी लाटल्यानंतर दोन्ही हातांच्या साह्याने पुरणपोळी लांबून घ्या. पुरणपोळी चांगली लांबली की तापलेल्या खापरावर भाजून घ्या. दोन्ही साईडने चांगले खरपूस भाजल्यानंतर त्याला थोडे तूप लावा व आपली खापराची पुरणपोळी तयार आहे. या खापराचे पुरणपोळी करताना कणकेमध्ये थोडा मैदा घालावा त्यामुळे पुरणपोळी फुटत नाही किंवा तुटतही नाही याचे प्रमाण अर्धी वाटी कणिक व अर्धी वाटी मैदा याप्रमाणे असेल.


वेळ व परिमाण::

तयारीची वेळ:१ तास
एकूण वेळ: १ तास ३० मिनिटे
परिमाण: १० जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7507

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.