आमसुलाची कढी
प्रस्तावना:::
आमसूलची कढी ही भरीत पुरी सोबत स्पेशली तयार केलेले जाणारी कढी आहे…. खानदेश भागामध्ये आवर्जून भरीत पुरी सोबत तयार केली जाते…. यामध्ये आमसूल चा वापर केला जातो..
साहित्य::
- सहा कोरडे आमसूल
- अर्धी वाटी बेसन
- दोन चमचे किसलेला गूळ
- दहा लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
- एक जाड मिरची
- एक ते दोन तुकडे दगडफूल
- दोन ते तीन कढीपत्त्याची पाने
- पाव चमचा हळद
- अर्धा चमचा धनापूड
- चवीप्रमाणे मीठ
- फोडणीसाठी जीरे मोहरी
- दोन चमचा तूप साजूक
कृती :::
सर्वप्रथम एका वाटीमध्ये आमसूल दोन तासासाठी एक वाटी पाण्यामध्ये भिजत घाला… साधारण दोन तास आपल्याला हे आमसूल भिजू घालायची आहे …..
त्यानंतर एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये बेसन पीठ एकत्र करून घ्यावे गोळे होऊ देऊ नये…
मिक्सर मधून अद्रक लसणाची पेस्ट करून घ्यावी….त्यामध्ये किसलेला गूळ सुद्धा एकत्र करून घ्यावा… इथे मी एक चमचा गुळाचा वापर केलेला आहे…..
तुम्हाला जर गोड कढी आवडत असल्यास तुम्ही दोन चमचे गुळाचा वापर करा…..त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालावी आणि एकत्र करून घ्यावे….
तसेच हळद सुद्धा घालून एकत्र करून घ्यावे… अर्धा चमचा धनापूर घालावे…. त्यानंतर त्यामध्ये आमसूल चे पाणी आमसूल सहित घालावे…
त्यानंतर एका पातेल्यामध्ये फोडणी घालताना दोन चमचे साजूक तूप घालावे.. त्यामध्ये जिरे मोहरी घालावी त्यानंतर कढीपत्ता घालावा…
त्यानंतर मिरचीचे काप घाला आणि व्यवस्थित परतवून घ्या…आणि दगडफूल घालावे आणि एक लसण पाकळी चे काप घालावे…
त्यानंतर त्यामध्ये आपण केलेले कढीचे मिश्रण घालावे… आणि सतत मिश्रण ढवळावे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालावे…
आणि त्यामध्ये अजून अर्धा ग्लास इतके पाणी घालावे… कढी आपल्याला घट्ट हवी किंवा पातळ हवी त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी घालावे….
कढीला चांगल्या चार ते पाच उकळ्या येऊ द्या… कढी चांगली मंद आचेवर शिजू द्या…. त्यानंतर कडीचा गॅस बंद करा…
आता ही कडी आपण भरीत पुरी सोबत एन्जॉय करू शकतो… ताकाची कढी तर आपण नेहमीच पितो… पण आमसूल ची कढी आंबट गोड अशा चवीची आणि आमसूल ही पाचक असते …..
त्यामुळे शरीराला थंड ठेवते… आणि चवही अगदी अप्रतिम लागते…
टिप्स::
कढी तयार करत असताना आमसूल अगोदर दोन तास आधी भिजू घाला… इथे मी सहा आमसुलीचा वापर केलेला आहे तुम्हाला जास्त आवडत असल्यास तुम्ही आठ आमसूल सुद्धा घालू शकतात… आणि गुळाचा वापरही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकतात…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:: २०मिनिटे
एकूण वेळ:: ४०मिनिटे
परिमाण::: दोन व्यक्तींसाठी
