स्टीम मोमो

by Vaishali Chaudhari
3 views

स्टीम मोमो


प्रस्तावना:::

मोमो हा पदार्थ नेपाळ साईड कडील असून तो खूपलोक आवडीने खातो…शिवाय अत्यंत हेल्दी आहे कारण आज आपण गव्हाच्या पिठाचे मोमो बघणार आहे….


साहित्य::

  • अर्धा किलो पत्ताकोबि
  • पाव किलो शिमला मिरची
  • पाव किलो गाजर
  • २० ते २५ लसूण पाकळ्या
  • १इंच अद्रक तुकडा
  • १ चमचा मिक्स हर्ब
  • १ चमचा ओरिगानो
  • १ चमचा सोया सॉस
  • चवीप्रमाणे मीठ
  • पाव किलो गव्हाची कणीक
  • तेल
  • पाणी


कृती::

पत्ताकोबी चोपर मध्ये एकदम बारीक चिरून घ्या.. तसेच सिमला मिरची धून एकदम बारीक चिरून घ्या….

गाजर धुऊन शिलून घ्या….ते बारीक किसून घ्या…. अद्रक लसूण पाकळ्या मिरची याची मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्या….

सर्व मिश्रण पत्ताकोबि गाजर शिमला अद्रक मिरची पेस्ट याचे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यावे…. कढई मध्ये थोडे तेल गरम करून सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावे….

त्यानंतर गॅस बंद करा…या मिश्रणात १ चमचा ओरिगॅनो १ चमचा मिक्स हर्ब १ चमचा सोया सॉस घालून मिश्रण एकत्र करा….

चवीप्रमाणे मीठ घाला….आपले मोमो चे सारण तयार आहे..आता एका परातीत कणीक घेऊन त्यात मीठ घाला….

कणीक कडक सर मळा…त्याची बारीक पोळी लाटून ग्लास किंवा वाटीने गोल लहान लहान पाऱ्या करून घ्या….

आणि त्यामध्ये मोमो चे सारण भरा…असे सर्व मोमो तयार करून घ्या… नंतर पातेल्यात पाणी उकळायला ठेवा….

चाळणी तेल लावून घ्या…त्यावर मोमो ठेवा…पाणी उकळले की मग चाळणी पातेल्यावर ठेवा…..त्यावर पक्के झाकण ठेवा….

१५ मिनिटे वाफवून घ्या…. गॅस बंद करा….आपले मोमोज स्टीम झाले आहे… मोमोज तयार आहे….

मोमोज ची चटणी


साहित्य:::

  • ५ टोमॅटो
  • ५लसूण पाकळ्या
  • ३ लाल मिरच्या
  • १ चमचा साखर
  • चिमूटभर मिरी पूड
  • तेल
  • चवीप्रमाणे मीठ


कृती::::

टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्या… पातेल्यात टोमॅटो लसूण पाकळ्या मिरची घालून ५मिनिटे उकळून घ्यावे….

नंतर साल काढून टोमॅटो काप करून घ्या…. नंतर मिक्सर च्या भाड्यात टोमॅटो मिरच्या लसूण घालून मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्या….

पातेल्यात १चमचा तेल घालून त्यात केलेली टोमॅटो पेस्ट घाला …त्यात साखर घाला…

चिमूटभर मिरी पूड आणि चवीप्रमाणे मीठ घाला…३ मिनिटे चटणी शिजवून घ्या…. गॅस बंद करा…आपली मोमोज ची चटणी तयार आहे…


मोमोज चे आकार तुम्ही मोदकाप्रमाणे किंवा व्हिडिओ मध्ये दाखविले आहे त्याप्रमाणे तुम्ही तयार करू शकतात…

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

11062

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.