पिझ्झा:::लाल पिवळा सिमला मिरची चा झटपट रंगदार पिझ्झा

by Vaishali Chaudhari
0 views

लाल पिवळा सिमला मिरची चा झटपट रंगदार पिझ्झा


प्रस्तावना::

पिझ्झा तापाने एक वेळा खातो पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वरायटी तयार करत असतो… नेहमी आपण हिरव्या सिमला मिरचीचा वापर करतो..

आज आपण येथे लाल आणि पिवळ्या सिमला मिरचीचा वापर केलेला आहे…


साहित्य:::

  • अर्धा किलो कणीक किंवा मैदा
  • दोन चमचे साखर
  • दोन चमचे ईस्ट
  • पाव किलो पत्ताकोबी
  • दोन लाल सिमला मिरची
  • दोन पिवळी सिमला मिरची
  • दोन कांदे
  • दोन लाल टमाटे
  • 100 ग्रॅम चीज क्यूब
  • मायोनिस
  • चार ते पाच चमचे टोमॅटो सॉस
  • एक चमचा ओरिगॅनो
  • चिली फ्लेक्स
  • एक चमचा मेरी पूड
  • मीठ
  • तेल


कृती:::

एक वाटीभर कोमट पाणी करून त्यामध्ये दोन चमचे साखर घाला त्यामध्ये दोन चिमटी इतके गव्हाची कणीक किंवा मैदा घाला…

त्यामध्ये दोन चमचे ईस्ट घाला.. त्यावर झाकण ठेवा दहा मिनिटे त्यानंतर या इस्ट फुगून येईल…. अर्धा किलो कणिक मध्ये चवीप्रमाणे मीठ घाला आणि तयार झालेले ईस्ट घाला आणि पाणी घालून कणीक मळून घ्या….

त्याला थोडंसं तेलाचा हात लावून घ्या… आणि ही कणीक साधारण अर्धा तास किंवा एक तास झाकून ठेवा…

हा कणकेचा गोळा चांगला फरमेंट होऊ नये… जाळीदार तयार होईल…. त्यानंतर याचे गोळे तयार करून ज्याप्रमाणे पोळी लाटतो त्याप्रमाणे जाड पोळी लाटा…

फोकच्या साह्याने त्याला होल करून घ्या… आणि मंद आचेवर तव्यावर दोन्ही बाजूला पाच मिनिटे शिकून घ्या… याच पद्धतीने सर्व पिझ्झा बेस तयार करून घ्या… इथे तुम्ही कणके ऐवजी मैद्याचा सुद्धा वापर करू शकता..


.. पण मी इथे हेल्दी म्हणून कणकेचाच वापर केला आहे… आता पत्ता कोबी बारीक चिरून घ्या सिमला मिरचीचे चौकोनी होतील असे काप करून घ्या…

एका कढईमध्ये थोडे तेल घालून पत्ताकोबी सिमला मिरची परतून घ्या… त्यामध्ये एक चमचा ओरिगानो एक चमचा मेरी पूड आणि चवीप्रमाणे मीठ घालून परतवून घ्या…

हे आपल्याला अत्यंत परतायचे नाही अगदी दोन मिनिटे टॉस करायचे आहे…


पिझ्झा बेसला लावायची चटणी साहित्य:::

  • दोन टमाटे
  • आठ ते दहा लसूण पाकळ्या
  • चवीप्रमाणे मीठ
  • चार ते पाच चमचे टोमॅटो सॉस
  • एक चमचा तिखट
  • चवीप्रमाणे मीठ.


कृती:::

दोन टमाटे चिरून घ्या आणि मिक्सरमध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या एक चमचा तिखट घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या….

कढईमध्ये तेल घालून टोमॅटोचे मिश्रण परतवून घ्या त्यामध्ये चार ते पाच चमचे टोमॅटो सॉस घाला… चवीप्रमाणे मीठ घाला त्यानंतर मिश्रणला उकळ आल्यानंतर गॅस बंद करा आपला पिझ्झा सॉस तयार झालेला आहे…


आता पिझ्झा तयार करण्यासाठी बेस घ्या.. त्यावर आपण तयार केलेल्या टोमॅटो पिझ्झा सॉस लावा.. त्यावर एक चमचा इतके मायनस लावा…

त्यावर पत्ताकोबी आणि शिमला मिरचीचे मिश्रण पसरवा.. आणि एका कांद्याच्या लांब लांब फोडी करून त्या लावा…

वरून ओरिगानो घाला.. वरून चीज खिसा… यावर चिली फ्लेक्स सुद्धा तुम्ही घालू शकता… त्यानंतर तव्यावर हा पिझ्झा ठेवून पाच मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्या..

खमंग असा आपला रंगतदार पिझ्झा तयार झालेला आहे…. आपल्याला टॉपिंग कशाचे हवे ते आपण वापरू शकतो… चला तर मग गरमागरम पिझ्झा एन्जॉय करूया!!!


टिप्स::

पिझ्झा तयार करताना मी इथे गव्हाच्या कणकेचा पिझ्झा दाखवलेला आहे… कारण मुलांसाठी योग्य आहे….(व्हिडिओ करताना बेस कसा भिजवायचा ते मी इथे दाखवलेले नाही कारण मागच्या व्हिडिओमध्ये बेस कसा बनवायचा ते मी दाखवलेले आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता..)


वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:: ३0मिनिटे
एकूण वेळ ::६०मिनिटे
परिमाण ::चार व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

9952

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.